गणपती बाप्पा..मोरया “! पुढच्या वर्षी… लवकर या ! च्या घोषनेत सरसम बु येथील गावाकऱ्यांनी गणरायांना नवयुवक गणेश मंडळ दिला शांततेत अखेर निरोप…..

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड


हिमायतनगर तालुक्यातील सरसम बु येथे नवयुवक गणेश मंडळांच्या वतीने ११ दिवसांच्या गणरायांची मोठ्या उत्साहात स्थापना केली होते.
या ११ दिवसांमध्ये बाप्पांची येथील गणेश भक्तांनी दररोज पूजा अर्चना करून “बाप्पा ‘ना आज वाजत गाजत मोठ्या आनंद उत्साहात ” गणपती बाप्पा मोरया ,पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत गावातून अति शांततेत मिरवणूक काढून कोणत्याही प्रकारचे गालबोट न लागता, डीजे डॉल्बी सिस्टीम न वाजवता, आज गणरायाला अखेरचा निरोप दिला आहे.
सरसम येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी गावात गणपतीची स्थापना मोठ्या उत्साहात केली जाते. येथील नवयुवक गणेश मंडळ वतीने ही पूर्ण गावांच्या वतीने ‘ श्रीं ची स्थापना करून मोठ्या उत्साहात गणरायांचा उत्सव आनंदात साजरा करतात.
सरसम या गावांमध्ये कोणत्याही प्रकारच्या , येथील सर्वच सण, उत्सव मोठ्या उत्साहात व शांततेत साजरे केले, आहे.
पोलीस स्टेशन हिमायतनगर चे पोलीस निरीक्षक बी.डी. भुसनूर साहेब यांनी दिलेल्या सूचना, आदेशांचे पालन करत आम्ही डॉल्बी डीजे न लावता पारंपारिक पद्धतीने पूर्ण गावभर मिरवणूक काढून व गणेश विसर्जन उत्सव शांततेत पार पाडत , आहे.यावेळी नवयुवक गणेश मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव,तसेच सर्व सदस्य गावातील जेष्ठ नागरिक , बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित राहून “बाप्पा’ ना शांततेत अखेर चा निरोप दिला.