
सहसंपादक : रामभाऊ भोयर
लोकसभा निवडणूक आली यावेळी मोदी म्हणतात अबकी बार 400 पार चारशे जागा मोदींना कशासाठी पाहिजेत ह्या चारशे जागा मोदींना देशाच्या विकासासाठी नाही तर घटना बदलण्यासाठी पाहिजेत अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राळेगाव येथील जनसंवाद यात्रे दरम्यान केली गांधी लेआउट येथील ओपन स्पेस मध्ये शिवसेनेच्या वतीने जनसंवाद यात्रा आयोजित करण्यात आली होती यावेळी प्रमुख वक्ता म्हणून उद्धव ठाकरे बोलत होते यावेळी मंचावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे मिलिंद नार्वेकर संजय देशमुख किशोर तिवारी बाळासाहेब मुनगीणवार विश्वास नांदेकर उद्धव कदम कॅप्टन सुर्वे विनोद काकडे आदी उपस्थित होते. उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले रशियामध्ये ब्लादिमीर पुतीनने जे केले तेच मोदींना भारतामध्ये करायचे आहेत विश्वास मताच्या जोरावरती रशियामध्ये जशी हुकूमशाही लावली तशी मोदींना 400 सीट आणून भारतामध्ये हुकूमशाही लावायची आहे हुकूमशाही लागली तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सुद्धा मोदीच ठरवतील यासाठी मोदींना चारशे जागा पाहिजेत नुकतेच याचे सूतोवाच केंद्रातील मंत्री अनंतकुमार यांनी केले आहे या भागाच्या विद्यमान खासदार यांचेवरती ईडीचे आरोप झाले त्यांचा पीए तुरुंगात होता व त्या जाऊन मोदींना राखी बांधतात प्रत्येक वेळी निवडणुका लागल्या की मोदी यवतमाळ मध्ये येतात यवतमाळकर मोदींना भरभरून मतांचे दान देतात किंवा सहकार्य करतात यवतमाळ मोदी साठी लकी ठरले आहेत ते या वेळेस तुम्हाला अनलकी करून दाखवायचे आहेत 2014 मध्ये मोदींनी यवतमाळ मध्ये जे आश्वासन दिले ती आश्वासने पूर्ण झाले आहेत का तसेच आर्णीच्या दाबडी येथील चाय पे चर्चा मध्ये त्यांनी जे आश्वासन दिली होती ती सुद्धा पूर्ण झाली का याचा विचार आपणच करायचा आहे किती जणांना पक्के घरे मिळाली किती जणांना उज्वला योजनेचा लाभ मिळत आहे किती जणांना पिक विमा चा लाभ मिळाला हे आपणच सांगायचे आहेत किती शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले बँका कर्ज पुरवठा तुम्हाला करतात का पिकांना हमीभाव मिळाला काय आदि प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थितना विचारले मोदी म्हणतात की काँग्रेसने 60 वर्षात देश लुटला पण मोदींनी दहा वर्षातच देश लुटला आहेत निवडणूक कर्जरोख्याच्या माध्यमातून भाजपाच्या खात्यात सात हजार कोटी जमा झाले आहेत तर काँग्रेसकडे केवळ साठ कोटी आहेत यावरून देश कोणी लुटला हे आपणच ठरवायचे आहेत मोदी म्हणायचे की प्रामाणिक जो असेल त्याला आम्ही बक्षीस देऊ आणि जो भ्रष्टाचारी असेल त्याला शिक्षा देऊ पण सध्या प्रामाणिक शेतकऱ्याला आत्महत्येचे बक्षीस दिले जात आहेत आणि भ्रष्टाचाराची पाठराखण मोदी करत आहेत यावेळी उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांचा लोकसभेतील व्हिडिओ सुद्धा लोकांना ऐकून दाखवला ज्यामध्ये कलावतीला मदत दिल्याचे अमित शहा सांगतात प्रत्यक्षात कलावती मात्र मला कुठलीही मदत भाजपाने केली नसून काँग्रेसने मदत दिल्याचे त्या व्हिडिओमध्ये आहे मला खोटे बोलता येत नाही लोक माझ्यावरती टीका करायचे की मला शेतीतले काही समजत नाही पण शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू मात्र मला कळतात त्यामुळेच मी शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची कर्जमाफी ही केली होती मोदींनी तरी देशातल्या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज एकदा माफ करून दाखवावे निवडणुकीपूर्वी ते माफ करून दाखवावे केवळ शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये टाकून शेतकऱ्यांची बोळवण मोदींनी करू नये मोदींच्या यवतमाळ येथील सभेला बारा कोटी खर्च आला हेच 12 कोटी जर मोदींनी गोरगरीब शेतकऱ्याला दिले असते तर शेतकऱ्यांना ती भरीव मदत झाली असती तुमचं नशीब मोदींच्या हातात नाही तर मोदींचेच नशीब तुमच्या हातात आहे मोदी सध्या म्हणतात की ये सब मेरा परिवार है कोरोना काळात मी सुद्धा माझे कुटुंब माझी जबाबदारी असे म्हटले होते आणि ती जबाबदारी मी पूर्ण केली होती आता मोदींनी देशातल्या गोरगरीब जनतेची जबाबदारी उचलावी अमित शहा माझ्या घरानेशाई वरती बोलतात अमित शहा चा मुलगा जय शहा याला क्रिकेटमधले काय समजते असेच उचलून त्याला क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष केले तुम्ही आमच्या मुलाबाळाविषयी बोलाल तर आम्ही सुद्धा तुमच्या मुलाबाळाविषयी बोलणार घराणेशाही विषयी बोलायचं झाल्यास माझे घराने सगळ्यांना माहीतच आहे माझ्या आजोबांच्या वडिलांनी प्लेगझालेल्या लोकांना मदत केली होती त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता अलीकडच्या काळातील माझे घराने सगळ्यांना माहीतच आहे सद्यस्थितीत सगळे उद्योग हे गुजरातला पळवल्या जात आहे वर्ल्ड कप ची फायनल मॅच मुंबईला होणार होती ती सुद्धा गुजरातला पळवल्या गेली व त्यामध्ये भारताला पराभव झाला यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ परंपरेने शिवसेनेचा मतदारसंघ राहिला येथील पालकमंत्र्यांनी खासदारांनी शिवसेनेशी नाही तर जनतेशी गद्दारी केली आहे आमच्या प्रयत्नाने दोन वेळेस मोदी हे मुख्यमंत्री झाले दोन्ही वेळा आम्ही मूर्ख बनलो ती चूक आम्ही कबूल करतो पण या निवडणुकीमध्ये मात्र आपल्याला मशालीवरचा खासदार तुम्हाला निवडून द्यायचा आहे ही मशाल हुकूमशाहीला खाक केल्याशिवाय राहणार नाही यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुद्धा उपस्थितना संबोधित केले ते म्हणाले की गद्दारांना भारतीय जनता पार्टी थारा देणार नाही शेतकऱ्यांची स्थिती ही दयनीय आहेत यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतात उद्धव ठाकरे साहेबांनी दोन लाख रुपयांचे कर्जमाफी केले होती आता हे सरकार शेतकऱ्यांच्या खिशातून पैसे काढण्याचे काम करीत आहेत आयात निर्यात धोरणाने शेतकरी हवालदिल झाला आहे कापसाची आयात केल्या जात आहेत तर कांद्याला आयात बंदी केल्या जाते पानंद रस्ते मंजूर आहे पण ते होत नाही आहेत बेंबळा प्रकल्प अजूनही अपूर्ण आहेत या आदिवासी बहुल भागाचा विकास करायचा असल्यास शिवसेनेशिवाय पर्याय नाही असे सुद्धा त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटले कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात मतदार संघातून लोकांची उपस्थिती होती उद्धव ठाकरे यांनी राळेगाव मध्ये सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला फार अर्पण केला तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी सदिच्छा भेट घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कैलास राऊत यांनी केले.
