
प्रतिनिधी: चेतन एस.चौधरी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात नंदुरबार जिल्ह्यातील उजळोद ग्रामपंचायतीने एक क्रांतिकारी निर्णय घेतला. वर्षानुवर्षे चार चौकटीत राहणाऱ्या बंजारा समाजातील महिलांना मानाचे स्थान देण्याचा निर्णय झाला. स्वातंत्र्यदिनी उजळोद ग्रामपंचायतीच्या उपसरपंच जबनाबाई उमराज राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी जबनाबाई यांनी सर्वांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली. ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे सर्व ग्रामस्थांनी स्वागत केले.
यावेळी सरपंच कलाबाई ठाकरे, माजी पंचायत समिती सदस्य श्रीराम पाटील, ग्रामसेवक श्री निकुंभ, प्रतिष्ठित नागरिक रमेश बंजारा, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.
