
ढाणकी-प्रतिनिधी(प्रवीण जोशी)
निंगणूर बिट अंतर्गत येत असलेल्या कृष्णापुर ग्राम येथे अवैद्यशिंदी विक्रेत्यांच्या घरावर पोलीसांनी छापा मारून 50 लिटर अवैद्य शिंदी व पाच हजार रूपये मुद्देमाल जप्त करूण आरोपीला ताब्यात घेतले.ही कारवाई 3 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 7 वाजे दरम्यान केली.
विजय रामप्रसाद शुक्ला वय 32 वर्ष रा. कृष्णापुर असे आरोपीचे नाव असून बऱ्याच दिवसांपासून तो बिटरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ग्राम कृष्णापुर येथे अवैद्य शिंदी विक्रीचा व्यवसाय करत असल्याची कुणकुण बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोस यांना लागली होती.त्यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार गजानन खरात, सहायक दत्ता कुसराम , होमगार्ड चंद्रमणी वाढवे यांनी त्यांच्या घरावर छापा मारूण 50 लिटर शिंदी व पाच हजार मुद्देमालासह जप्तीची कारवाई करूण कलम 65 ई नुसार मुंबई दारूबंदी कायदा प्रमाणे कारवाई केली.
बिटरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कृष्णापुर,सोईट,आणि ढाणकी शहरातील टेंभेश्वर नगर येथे मोठया प्रमाणात अवैद्य शिंदी विक्रीचा व्यवसाय होत असल्याची नागरीकांत ओरड सुरू आहे.शिंदी विक्रेत्यांनी ग्रामीण भागात आपले मोठया प्रमाणात जाळे पसरविले होते.आणि ग्रामीण भागातील तरूण पिढीला आपले लक्षे बनवून अनेक तरूणांना नशेच्या आहारी केले होते.कमी कष्टामध्ये वारेमाप पैसा कमविण्याच्या नादात शिंदी मध्ये नशेच्या गोळया मिश्रीत करूण तरून पिढीच्या आयुश्याशी हा जुगार सुरू असतांना ढाणकी शहरातील सामाजीक कार्यकर्ते शेख तयब शेख अहेमद, सयद खालीद सयद जिलानी, यांनी शहरात अवैद्य होत असलेली शिंदी विक्री बंद करण्याबाबत ठाणेदार प्रताप भोस यांना निवेदणातून मागणी केली होती.त्या अनुशंगांने पोलीसांनी अवैद्य शिंदी अवैद्य देशी व गावठी अड्डयावर छापे मारले.त्यात कृष्णापुर येथे अवैद्य शिंदी विक्री करतांना विजय रामप्रसाद शुक्ला हा युवक आढळून आला.
