
- कोणतीही मेहनत न करता दारू विक्रीच्या पैशातून अल्पवयीन तरुण मुलींना मोबाईल व महागडे गिफ्ट भेट देऊन आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याची स्पर्ध
सहसंपादक : रामभाऊ भोयर
पवनार येथील अल्पवयीन मुलीस गर्भधारणा करणाऱ्या मुलीसह त्याच वॉर्डातील आणखी चार मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणारे कोण या मागील गूढ अद्याप दडलेले असून लवकरच याचा पर्दाफाश होणार आहे इयता नववीत शिकणाऱ्या या पाचही मुली एकमेकींच्या जिवलग मैत्रिणी असल्याची माहिती सांगण्यात येत आहे यात,या पीडितेला सोडून अजून चार मुलींचे प्रेमी कोण याचा शोध घेणे सुरू आहे
कोणतीही मेहनत न घेता दारू विक्रीच्या काळ्या पैशातून अल्पवयीन तरुण मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढण्या करीता मुली शाळेत जानाच्या व शाळा सुटण्याच्या वेळेत टपोरी शाळेसमोर बसून टवाळक्या करणे अल्पवयीन मुलींना बघून टोमणे मारणे तसेच त्यांच्याकडे बघून हसणे इतरणे तसेच महागड्या गाड्या रोडवर उभ्या करून ब्रिस्टालचा दम उगारत मुलींना प्रपोज करणे हि नित्याची बाब झाली आहे या करीता सेवाग्राम पोलिसांना या बाबत सेवाग्राम पोलिसांना याची माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली मात्र यावर पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने टपोरी भाईगिरी करणाऱ्यांमध्ये आमचे कोण काय करणार अशीची काहीशी भूमिका दिसून येत आहे त्याच बरोबरमुलींना आपल्या प्रमाच्या जाळ्यात ओढण्या करीता दारू विक्रीच्या पैशातून अल्पवयीन तरुण मुलींना मोबाईल, कपडे, व महागड्या भेट वस्तू दिवून आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याची जणू स्पर्धाच रंगली आहे की काय असेच काहीसे दृश्य दिसून येत आहेपीडितेलाहि देण्यात आले होते चार वेळा मोबाईल
गर्भधारणा झालेल्या पीडितेला हि चार वेळा मोबाईल देण्यात आल्याची माहिती पीडितेच्या परिवाराकडून देण्यात आली आहे.
एकदा 13 हजार रुपये किमतीचा अँड्रॉइड मोबाईल देण्यात आला तर तीन वेळा छोटा मिनी मोबाईल देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे त्यात तीन मोबाईल परिवारास सापडल्याने रागाच्या भारात ते पीडितेच्या वडिलांकडून फोडण्यात आले तर एक मोबाईल अद्याप दिसलेला नसल्याची माहिती परिवाराकडून देण्यात आली घरी खाण्याची सोय नसताना व
कुठलेही काम धंदे न करता तरुणींवर उधळण्या करीता अखेर हजारो रुपये येतात तरी कुठून असा प्रश्न पडला असता अखेर दारू विक्री किंवा काळा बाजार केल्या शिवाय इतके पैसे येवूच शकत नाही असा आरोप आता ग्रामस्थांन कडून होत आहे परिणामी या टवाळखोरांच्या मुसक्या सेवाग्राम पोलीस आवळणार की यांना पुन्हा तरुणीच्या छेडखानीकरिता मोकाट सोडणार या कडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
