
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वणी शहरातील अनेक वर्षांपासून सामाजिक ,शैक्षणिक व राजकिय क्षेत्राच्या माध्यमातून महिलांशी निगडित प्रश्नांना न्याय मिळवून देण्याची धडपड, वसतिगृहात शिकणाऱ्या मुलींना वैद्यकीय व शैक्षणिक मदत, ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल महिलांना मदत व त्यांच्या समस्या सातत्याने रेटून पाठपुरावा करणे व कॉलेज मधील मुलींना सन्मानाची वागणूक मिळावी म्हणून एका प्राध्यापकाला धडा शिकवने या सारख्या अनेक गोष्टीतून महिलांना सन्मान मिळवून देण्याची धडपड पाहून वणी शहरातील विविध क्षेत्रातील नामवंत महिलांनी राजू तुराणकर यांचे घरी जाऊन शाल व श्रीफळ देऊन सपत्नीक सन्मान केला,
यावेळी पौर्णिमा शीरभाते महिला बाल कल्याण प्रोजेक्ट आफिसार, शालिनीताई रासेकर माजी नगराध्यक्ष, मंदाताई बांगरे, विजया आगबतलवार,सविता ठेपाले, वंदना धगडी, जोत्सना आचार्य, सुरेखा वाडीचार ,जेष्ठ पत्रकार परशुराम पोटे, गीता तुराणकर, साधना तुराणकर व ज्योती तुराणकर व रागिणी तुराणकर उपस्थित होत्या.
