
सहसंपादक:- रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील मौजे खडकी येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत जिल्हास्तरीय शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी श्री संतोष डाबरे प्रकल्प संचालक आत्मा यवतमाळ यांनी उपस्थित शेतकऱ्यांना बीबीएफ पद्धतीने सोयाबीन लागवड करण्याबाबत आवाहन केले. तसेच कपाशी पिकामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल त्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येईल याबाबत सखोल मार्गदर्शन केले, तसेच गावागावात शेतकरी बचत गट व शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून कृषी व आत्मा मार्फत विविध योजनांची माहिती दिली तसेच येत्या खरीप हंगामात कपाशी पिकावरील गुलाबी बोंड आळी चे नियंत्रणासाठी उपाययोजना करणे याबाबत माहिती दिली. तसेच केंद्र शासनामार्फत नैसर्गिक शेती अभियानामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपली शेती रसायनमुक्त करून नैसर्गिक शेती कडे वळणे सध्याच्या काळात गरजेचे असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जैविक खते व जैविक कीटकनाशकाचा उपयोग करणे बाबत मार्गदर्शन केले.
कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ येथील कीटकशास्त्रज्ञ डॉ.प्रमोद मगर यांनी सोयाबीन हे स्वपरागसिंचित पीक आहे. या पिकाचे बियाणे सरळ वाहनाचे आहे.यामुळे दरवर्षी बियाणे बदलण्याची आवश्यकता नाही. मागील दोन वर्षात वापरलेली प्रमाणित बियाण्यापासून उत्पादित होणारे सोयाबीन हे शास्त्रीयदृष्ट्या पेरणीकरिता योग्य असते. घरचे बियाणे वापरताना चाळणी करून घ्यावी,बियाणे नाजूक असल्याने पोत्याची हाताळणी व वाहतूक करताना योग्य काळजी घ्यावी तसेच बीज प्रक्रिया केल्याशिवाय सोयाबीन ची पेरणी करू नये, बीज प्रक्रिया साठी उपयुक्त जैविक व रासायनिक औषधीचा वापर कसा करावा, कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेण्याच्या पद्धतीचा तंत्रज्ञान याबाबत मार्गदर्शन केले तसेच कपाशी व सोयाबीन पिकावरील किडीचे नियोजन कसे करता येईल याविषयी सखोल मार्गदर्शन केले. यानंतर कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ येथील अभियांत्रिकी शाखेचे विषय विशेतज्ञ श्री राहुल चव्हाण यांनी बीबीएफ तंत्रज्ञानाचे महत्त्व बीबीएफ लागवडीची पद्धत, टोकन पद्धत तसेच बीबीएफ लागवडीमुळे उत्पादनात होणारी वाढ तसेच बदलत्या वातावरणाची पीक पद्धतीवर परिणाम होत असल्याबाबतचे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमा चे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी श्री.अमोल जोशी यांनी केले तालुका कृषी अधिकारी श्री.अमोल जोशी यांनी कृषी विभागाच्या योजनेची माहिती शेतकऱ्यांना दिली या नंतर श्री कल्पेश वाघमारे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी विभागाचे विविध योजनेची माहिती तसेच सोयाबीन पेरणीचे अष्टसूत्री, पेरणीपूर्वी उगवण क्षमता तपासणे, बीज प्रक्रिया तसेच कृषी विभागाच्या विविध योजनेची माहिती. तसेच प्रधानमंत्री सुष्म अन्नप्रक्रिया उद्योगाची माहिती दिली, सदर कार्यक्रमात, मंडळ कृषी अधिकारी श्री.कल्पेश वाघमारे आत्माचे बिटीएम श्री मयूर शिरभाते,तंत्र कृषी अधिकारी श्री.राजू ताकसांडे साहेब तसेच खडकी येथील कृषी सहाय्यक श्री.प्रकाश ढोले तसेच रिधोरा येथील प्रगतशील शेतकरी हरीशभाऊ काळे व खडकी येथील सरपंचा सौ.नहातेताई तसेच महा डी बी टी तंत्रज्ञान विषयक श्री.प्रितम इंगोले तसेच खडकी येथील प्रगतशील शेतकरी देविदास काळे व हेमंत वाभिटकर व विभागाचे इतर अधिकारी व कर्मचारी व प्रगतशील शेतकरी व पंचकृशीतील महिला व पुरुष शेतकरी मोठ्या संख्याने उपस्थित होते, सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु श्रुती भोयर कृषी सहाय्यक झाडगाव यांनी केले.
