
सहसंपादक : रामभाऊ भोयर
**
कलावंत सामाजिक संघटना यांच्या वतीने ग्राम जयंती महोत्सव कळंब येथे सांस्कृतिक भवन मध्ये मेळावा आयोजित केला होता.या मेळाव्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष मा पद्माकर जी ठाकरे जिल्हा सेवा धिकारी होते तर प्रमुख मार्गदर्शक मा अँड.शाम खंडारे राष्ट्रीय सचिव कलावंत संघटना विदर्भ प्रमुख मा भवरे साहेब जिल्हा अध्यक्ष मा बनसोड साहेब आणि मा बसवेश्वर माहुलकर सचिव, चिंतामणी देवस्थान कळंब हे होते तसेच प्रमुख अतिथी सत्कारमूर्ती मा, मधुसूदन कोवे गुरुजी मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.दिगांबर गाडगे, तालुका सेवाधिकारी यांनी केले . ग्राम जयंती महोत्सव साजरा करण्यासाठी तालुक्यातील विविध गावांतील गुरुदेव सेवा भजनी मंडळ बोलावून भजनाचे सादरीकरण करण्यात आले आणि मान्यवरांचे मार्गदर्शन करण्यात आले सत्काराला उत्तर देताना मा मधुसूदन कोवे गुरुजी यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विविध कार्याची माहिती, स्वातंत्र्याची चळवळ आणि संघटनात्मक भुमिका आपल्या मार्गदर्शनातुन विशेष मांडणी केली* *ग्राम जयंती महोत्सव आणि कलावंत मेळावा आयोजन मा अशोकराव उमरतकर जिल्हा संघटक मा गंगाधर घोटेकर तालुका अध्यक्ष राळेगाव मा वासुदेव दाभेकर तालुका अध्यक्ष कळंब सौ मीनाताई वाघ जिल्हा संघटक मा गिरीधर जी ससनकर कार्याध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच जयवंत नाटक मारोतराव आत्राम तालुका प्रमुख गुरुदेव सेवा मंडळाचे सर्व सेवाधिकारी यांच्या सहकार्याने ग्राम जयंतीनिमित्त कलावंत मेळावा आनंदाने पार पडला कार्यक्रमाचे आभार मा अशोकराव उमरतकर यांनी मानले
