
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील रिधोरा व चिखली येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून आमदार डॉ अशोक उईके, तहसीलदार डॉ रविंद्र कानडजे यांच्या हस्ते चेक देण्यात आला. सविस्तर वृत्त असे सतंतच्या ना पीकी मुळे रिधोरा येथिल युवा शेतकरी सुरेश श्रीहरी सातघरे यांनी २० आगस्ट रोजी विषप्राशन करून आत्महत्या केली होती तर चिखली येथील देवेंद्र कीसनाजी पुरके यांनी ९ सप्टेंबर रोजी विषप्राशन करून आत्महत्या केली होती सदर आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची दिवाळी अंधारात होवू नये म्हणून राळेगाव तहसीलदार डॉ रविंद्र कानडजे यांनी दोन्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना २१ आक्टोंबर रोजी आमदार डॉ अशोक उईके यांच्या हस्ते आर्थिक मदत म्हणून दोन्ही गावांतील आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या वारसांना एक, एक लाखाची मदत देण्यात आली आहे सदर ही मदत स्वीकारतांना रिधोरा येथिल मृतक सुरेश श्रीहरी सातघरे यांची पत्नी सुरेखा सातघरे तर चिखली येथील मृतक देवेंद्र कीसनाजी पुरके यांची पत्नी अर्चना पुरके यांच्या कडे शासनाने दिलेली मदत चेक द्वारे देण्यात आली आहे . सदर चेक देतेवेळी आमदार डॉ अशोक उईके, चितरंजन कोल्हे भाजपा तालुकाध्यक्ष, माजी प.स. सभापती प्रशांत तायडे, सदाशिवराव महाजन सह भाजपा कार्यकर्ते, तसेच महसूल विभाग तहसीलदार डॉ रविंद्र कानडजे, महादेवराव सानप मंडळ अधिकारी वाढोणा बाजार, दुर्गेश बावनकुळे तलाठी रिधोरा, दिपक खीरडकर कोतवाल, ग्रामपंचायत कर्मचारी राजु पंडीले, भास्कर तोडासे उपस्थित होते
आमची दिपावली कार्यालयात आहे.आम्ही शेतकऱ्यांच्या सेवेसाठी तत्पर आहे आम्ही दोन आठवड्यापासून तालुक्यातल्या सर्व १३५ गावाच्या शेतकऱ्यांच्या याद्या बॅंकेत पाठवल्या सर्व बिल आरिट करून घेतले आहे.किन्ही जवादे, विहीरगाव येथिल काही शेतकऱ्यांच्या अडचणी आल्या होत्या त्यापण आम्ही सुधारित करून पाठवल्या आहेत
तहसीलदार डॉ रविंद्र कानडजे राळेगाव
