जैन धर्मीयांचा महत्त्वाचा क्षण पर्युषण महापर्वाचा कार्यक्रम संपन्न



प्रतिनिधी::प्रवीण जोशी

ढाणकी शहरातील जैन धर्मस्थानकामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पर्वपर्युषण हा धार्मिक कार्यक्रम दि.१२ सप्टेंबर ते१९/९/२०२३ला मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी समाज बांधवांना प्रबोधन करण्यासाठी राष्ट्रसंत, आचार्य सम्राट. पू.श्री. आनंदऋषीजी म.सा.यांची प्रेरणा घेऊन तीलोकरत्न स्थानकवाशी धार्मिक जैन परीक्षा बोर्ड अहमदनगर यांच्या मार्गदर्शनात स्वाध्याय सेवा देण्यास तिलकराज राजेंद्रजी गुगलीया व सुभाषचंद्र लालचंदजी बेगानी यांनी ढाणकी येथील जैन समाज बांधवांना मार्गदर्शन करताना सांगितले जगाला शांततेची संमतेची व बंधुत्वाची शिकवण भगवान महावीरांनी दिली भगवान महावीर हे जैनांचे २४ वे धर्मगुरू आज इतके वर्ष होऊन गेली त्यांच्या कार्याला पण संपूर्ण विश्वाला व पृथ्वीवरील चराचरातील सजीव सृष्टीला त्यांच्या विचारांची गरज भासते यावरून त्यांच्या विचाराची उंची अगणितच आहे व त्याचे विचार आत्मसात केल्यास मानवाची मोह, लोभ, हव्यास, मस्यर या बाबीतून सुटका होते .यावेळी आलेल्या मान्यवरांनी सांगितले की कोणतेही कार्य करीत असताना ते मनोभावे करावे जास्तीत जास्त परमेश्वराच्या सानिध्यात राहून ईशभक्ती करावी व अहिंसा हाच खरा मार्ग आहे मानव जन्म हा अमूल्य असून क्षमा विरस्यभूषणम क्षमा हे वीरांचे कार्य आहे. असे उद्बोधन सुद्धा यावेळी करण्यात आले यामध्ये सतत आठ दिवस अविरत सूत्रवाचन सुद्धा करण्यात आले सर्वसामान्यांना त्रास होईल व आपल्यामुळे कोणी दुखावल्या जाऊ नये व जास्तीत जास्त फलाहार व शाकाहार करावा याचे महत्त्व सुद्धा या पर्युषणपरवा मध्ये सांगण्यात आले जीवन जगत असताना व संसाररुपी चक्रामध्ये गुरफटल्यानंतर अडचणी व समस्या शांतपणे राहून त्यावर कशी मात करता येईल हे सुद्धा यावेळी सांगण्यात आले या कार्यक्रमाला समाजातील ज्येष्ठ नागरिक,महिलामंडळ तरुण युवक, युवती व लहान मुले आवर्जून उपस्थित होते कार्यक्रम होत असताना तीन पिढ्या एका छताखाली संस्काराचा वसा एकमेकांना देत असल्याचे चित्र दिसून आले ही विशेष बाब होय तसेच “अहिंसा परम धर्मो” जगा आणि जगू द्या हा भगवान महावीरानी सांगितलेल्या मूलमंत्र ध्यानात ठेऊन आयुष्य क्रमन केल्यास यातच मोक्ष प्राप्ती आहे असे यावेळी प्रबोधन करण्यासाठी आलेल्या तिलकराज राजेन्द्रजी गुगलीया यवतमाळ, व सुभाषचंदजी बेगानी खामगाव यांनी सांगितले संघपती कमलचंदजी भंडारीसह यावेळी मोठ्या संख्येने जैन समाज बांधव उपस्थित होता