उमरखेड महागाव विकासात्मक मागासले पण दूर करण्यासाठी आ. किसन वानखेडे यांना मंत्रीपदाच्या लाल दिव्याची गरज..!


प्रति::प्रवीण जोशी
ढाणकी


उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्र जिल्हा मुख्यालयापासून व विकासापासून कोसो दूर आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड महागाव तालुक्यातील उच्च दर्जाची काळी कसदार जमिनीची विपुलता असताना नैसर्गिक संपत्ती मोठ्या प्रमाणात असली तरी व्हावा तसा या भागाचा विकास झालेला नाही असे मतदात्यांना वाटते. दराटी, मोरचंडी, मन्याळी, खरबी, या बंदी भागातील खेडेगावांसाठी जिल्हा हा अंदाजे दोनशे किलोमीटर लांब असल्याने स्थानिक प्रशासनाच्या बाबतीत सुद्धा हा भाग दुर्लक्षितच राहिलेला आहे. पैनगंगा अभयारण्याची किनार लाभली असली तरी त्याची सुद्धा अपरिमित हानी मागील काही दिवसात बघायला मिळाली. उमरखेड तालुक्याला उपजिल्हा रुग्णालय असले तरी तालुक्यातील गंभीर आजार व अपघात रुग्णांना नांदेड येथे गेल्या शिवाय पर्याय नाही. सहस्त्रकुंड धबधबा हे विलोभनीय क्षेत्र उमरखेड तालुक्यात असल्या कारणाने पावसाळ्यात येथे अनेक पर्यटक येतात व मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. पण पर्यटकांना राहण्यासाठी निवासाची योग्य सोय सुविधा उपलब्ध नाही. ढाणकी शहराला तालुका करू असे आश्वासन प्रत्येक पंचवार्षिक योजनेत सांगण्यात येते परंतु ते बोलण्यापुरतेच राहिले या विभागाचे औद्योगिक मागासले पणाचे लक्षणे कायम आहे. अनेक बेरोजगार सुशिक्षित तरुण रोजगारासाठी तेलंगणा शेजारी असलेल्या राज्यात जातात. शेती हा प्रमुख व्यवसाय असला तरी मुख्य बाजारपेठ असलेल्या ढानकी शहराला नाफेड चे हमी भाव केंद्र नाही या कमतरतेची सातत्याने जाणीव होते. तर दहावी व बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी कोणत्याही सोयी सुविधा ढाणकी येथे नसल्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब आर्थिक अडचणीमुळे अनेक विद्यार्थी शिक्षणा पासून वंचित राहतात.
मुख्य म्हणजे या भागाचे औद्योगिक पिछेहाट कायमच राहिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमरखेड महागाव मतदार संघाच्या मतदात्यांचा विचार करून भाजपचे आमदार म्हणून निवडून आलेल्या उमेदवारास नामदारांमध्ये रूपांतर करण्याची गरज प्रकर्षाने होती. हीच पुढील वाटचालीसाठी पक्षाच्या योग्य वेळ होती उमरखेड महागाव बंदी भाग तालुक्याचा सर्वांगीण विकास करून चेहरा मोहरा बदलीसाठी या भागास लालबत्ती ची गरज नक्कीच भासते राजकीय अधिकार वर्चस्व आर्थिक बळ प्राप्तीसाठी मंत्रिमंडळात एखाद्या खात्याचे मंत्रीपदी वर्णी लागावी असे मतदारांना अपेक्षित होतं. उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या मतदारसंघापैकी एक आहे. लोकसभा व विधानसभा परीसिमन आदेश २००८ नुसार केलेल्या मतदार संघाच्या रचनेनुसार उमरखेड महागाव मतदार संघ हिंगोली लोकसभा मतदारसंघात मोडतो प्रशासकीय दृष्ट्या जिल्ह्याचे स्थळ आणि रचनेनुसार लोकसभा मतदारसंघ विभिन्न असल्याने समन्वयाचा अभाव व प्रचंड राजकीय दुर्लक्षितपणामुळे उमरखेड महागाव तालुक्याचा व्हायला पाहिजे होता तसा विकास झालेला नाही. परंतु उमरखेड महागाव हा सातत्याने भाजपच्या ताब्यात आहे त्यामुळे त्यांच्या कालावधीत लोक प्रतिनिधिनी मुंबई दरबारी आपले राजकीय वजन वापरून मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणून विकासाला गती देण्याच काम केलं. समृद्धी महामार्गामुळे अनेक गाव खेड्याची उन्नती झाली शिवाय या मुख्य मार्गाला जी लहान खेडेगाव आहे तेथील पक्के रस्ते करून महामार्गाला जोडण्याचे प्रयत्न चालू आहे पैनगंगा नदीवर बांधलेल्या पूलामुळे मराठवाडा विदर्भाचे अंतर काही प्रमाणात कमी झाले.