
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथे दिनांक १६-१२-२३ रोजी मारेगाव येथील मांडवकर हार्डवेयर दुकानातुन घराचे बांधकामाकरीता पैसे देऊन विकत घेतली व पैसे देऊन लोहा सळाख पाठविण्यास सांगीतले असता मारेगाव येथील दुकानदाराने लोहा सळाख दहेगाव येथे पाठविली असता लोहा लोखंडी सळाख ती दहेगाव गावाजवळ लागुन असलेल्या गोडावुनच्या खुल्या जागेत ठेवली होती. पण दिंनाक १७-१२-२३ रोजी १ ते ३ च्या दरम्यान माझ्या घराच्या बांधकामा करीता आणेलेली १० एम,एम चे आणलेले लोहा लोखंडी सळाख ११ नग असलेले १० बंडल अज्ञात दोन ते तीन चोरटयांनी चोरी करुन नेत असल्याचे माझ्या गोडावुनला लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात फोटो पाहीले असता तेव्हा त्या सीसीटीव्हीमध्ये तोंडाला रुमाल बांधुन चोरी करीत असल्याचे दिसुन आले.त्यामुळे त्या लोहा लोखंडी सळाख ऐक नग ४०० रुपये प्रती नग प्रमाने ११० नग त्यांची अंदाजे कींमत ४४०००हजार रुपयाचा मुद्देमाल चोरी गेला असल्याची दहेगाव येथील रुपेष जनार्धन आवारी रा .दहेगाव वय ३० वर्ष यांनी एफ आय. आर दाखल करून भा.द.वि.३७९/३४ प्रमाने अज्ञात चोरट्यांन विरुद्ध वडकी पोलिस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास वडकी पोलिस करीत आहे.
