सहसंपादक : रामभाऊ भोयर
नुकतेच शनिवारी बापांचे आगमन झाले असून
येत्या दुसऱ्या दिवसापासून बापणा निरोप देण्यात येत आहे
मात्र विसर्जन कुंडाची दयनीय अवस्था असल्याचे दिसून येत आहे कुंडात चार ते पाच फूट गाळ जश्या च्या तसा साचून असल्याने त्याच कुंडात टँकरद्वारे जिल्हा प्रशासनाच्या वतीने पाणी टाकण्यात येत असल्याने भाविकांकडून तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.
धाम नदी पात्र दूषित होऊ नये या करीता शासनाच्या वतीने मोठा गाजा वाजा करत लाखो रुपयांचा निधी खर्च करून विसर्जन कुंडाची निर्मिती करण्यात आली
केमिल्युक्त रंग असल्याने गणपती बाप्पा यांना नदीत विसर्जित न करता विसर्जन कुंडातच विसर्जित करावे अशी अट शासनाच्या वतीने करण्यात आली असली तरी याच कुंडातील पाणी अखेर नदी पात्रातच सोडले जाते तर मग ते केमिकल युक्त नदीत सोडलेले पाणी शुद्ध होते का असा प्रश्न या वेळी भाविकांकडून उपस्थित होत आहे .
काहिंकडे दिडच दिवसाचा गणपती आहे विसर्जन कुंडाची दयनीय अवस्था बघता भाविकांकडून थेट नदी पात्रातच विसर्जन करण्यात येत आहे आज रविवार रोजी दिवसभरात सुमारे 50 गणपती बापानं निरोप देण्यात आल्याचेही दिसून आले
बापानं निरोप देणे सुरू झाले मात्र जिल्हा प्रशासनाला जाग कधी येणार विसर्जन कुंडाची
साफ सफाई करणार की त्याच सडलेल्या गाळात पाणी सोडून विसर्जन करण्यात येणार या कडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
मागील वर्षी मोठ्या प्रमाणात घरगुती सहित हाडपक्क्या गणपतीचे विसर्जन याच विसर्जन कुंडात करण्यात आले त्याचा मोठ्या प्रमाणात चार ते पाच फूट गाळ साचून आहे त्याची साफ सफाई न करता त्याच विसर्जन कुंडात पाणी भरल्यास विसर्जन करून देणाऱ्या भोई लोकांना त्वचेचा रोग उद्भवणार असल्याची भीती व्यक्त होत आहे असे झाल्यास याला जबाबदार कोण आश्या चर्चांना आता उधाण येवू लागले आहे.
सामाजिक कार्यकर्ता
बाजीराव हिवरे
शासनाने वेळ न विचविता नागरिकांच्या जीवाचीहि पर्वा करावी
त्याच गडूळ व सडक्या गारात पाणी न सोडता विसर्जन कुंड स्वच्छ करूनच त्यात पाणी सोडावे त्या मुळे विसर्जन करणाऱ्या भोई लोकांना सुधा आपल्या शरीराची राखण करणे सोईचे होईल त्वचेचे रोग उद्भवणार नाही
सामाजिक कार्यकर्ता
प्रकाश चोंदे
कुंडात गाळ साचून आहे आधी त्याची विल्हेवाट लावून मगच त्यात पाणी सोडावे अशी माहिती वर्धा उप विभागीय अधिकारी यांना देण्यात आली आहे पवनार ग्राम पंचायती कडून गवत तसेच काडी कचरा कापून साफ सफाई करण्यात आली आहे त्याच बरोबर विद्युत रोषणाईचे आमचे कडे असलेले काम पूर्ण करण्यात आले असून कुंडाची साफ सफाई करण्याचे काम जिल्हा प्रशासनाचे आहे बांधकाम विभागाचे अधिकारी अद्याप पर्यंत घटना स्थळी आले नाही
ग्राम विकास अधिकारी
ए बी ढमाळे