
सहसंपादक : रामभाऊ भोयर
एसटी बस आगाराचे
वेळापत्रक मागील काही दिवसांपासून कोलमडले आहे. कधी वेळेत तर कधी बसेस उशिराने धावत असून अशा अवेळी सुटणाऱ्या बसेस मुळे मानसिक त्रास सहन करावा लागत आहे तेव्हा विभागीय नियंत्रकानी या प्रश्नाकडे गणेभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने जवळपास अडीच वर्षांपूर्वी ज्येष्ठांना मोफत व महिलांना अर्ध्या तिकिटात एसटी बसमधून प्रवास करण्याची सवलत दिली आहे. त्यामुळे प्रवाशांचा कल एसटी महामंडळाकडे अधिक वाढला आहे. तेव्हा पासून उत्पन्नाच्या बाबतीत राळेगाव आगार प्रथम क्रमांकावर असला तरी आगारात बऱ्याच भंगार बसेस आहे परंतु राळेगाव आगारात बऱ्याच भंगार गाड्यां असल्याने कधीकाळी बंद पडेल याचा नेम नाही तर या भंगार गाड्यामुळे ग्रामीण पासून तर लांब पल्ल्यांच्या बसेसचे नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे प्रवाशांना खासगी बसने जावून प्रवाशांना अधिकचे पैसे देत घर गाठावे लागत आहे.
आजमितीस राळेगाव आगारातून
अकोला अमरावती चंद्रपूर नागपूर अशा लांब पल्याच्या बसेशीचे नियोजन कोलमडल्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करवा लागत आहे .त्यामुळे आगार प्रमुखांनी याकडे वेळीच लक्ष द्यावे अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
बहुतांश बसेस खिळखिळ्या
राळेगाव आगारातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. परंतु, त्या तुलनेत बसेसची संख्या अपुरी आहे. त्यातच बहुतांश बसेस खिळखिळ्ळ्या असल्याने नादुरुस्तीचे प्रमाणही वाढले आहे. यासंदर्भात प्रवाशांतून नेहमीच ओरड सुरू असते. पावसाळ्यात तर काही बसेसमधून पाणी गळत असते तेव्हा प्रवास करताना प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो याकडे राज्य मार्ग परिवहन महामंडळाने लक्ष देणे गरजेचे आहे.
