
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
अवैधदारू विक्रीने अनेक संसार उध्वस्त झाल्याची उदाहरणं आहेत. याचा सर्वाधिक फटका महिलांना बसतो. लहान मुलेही दारूच्या आहारी जात असल्याने गावगाडा बिघडतो, राळेगाव तालुक्यातील मौजा. देवधरी येथे हाच प्रकार सुरु आहे. कुठलाही परवाना नसतांना खुलेआम अवैद्य दारू मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे, परंतु पोलिस प्रशासन सोईस्कर दुर्लक्ष करीत असल्याने येथील महिला आक्रमक झाल्या. मनसे च्या नेतृत्वात वडकी पो. स्टे. वर शेकडो नागरिक धडकले. अवैध्य दारू विक्री विरोधात ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले. हा प्रकार बंद न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
कारवाई होतं नसल्याने दारू विक्रेत्यांची हिंमत वाढली आहे . महिलांच्या संयमाचा बांध अखेर फुटला, मनसे राळेगाव तालुका संघटक नरेंद्र खापणे यांच्या नेतृत्वात आज असंख्य महिलांसह नागरिकांनी वडकी पोलीस स्टेशनंवर धडक दिली. गावातील अवैध देशी दारू विक्री बंद करा अशा मागणीचे निवेदन त्यांनी दिले
या बाबत येथील स्थानिक महिलांनी नागरिकांनी स्थानिक प्रशासनाशी व संबंधित पोलिस कर्मचारी वारंवार तक्रार करून सुद्धा ही अवैद्य दारू विक्री बंद होत नाही किंवा याबाबत कुठलाही कारवाही झालेली नाही. सदर चालू असलेली अवैद्य दारू विक्री बंद करण्यासाठी स्थानिक प्रशासन व पोलीस प्रशासन असमर्थ असल्याने देवधरी येथील महिलांनी नागरिकांनी गेल्या काही दिवसापूर्वी मनसे ला पत्रा द्वारे कळवीले की देवधरी या गावात चालू असलेल्या अवैद्य दारू विक्रीने महिलांना शाळकरी विद्यार्थ्यांना व इतर सामाजिक घटकांना त्रास होऊन गावाची शातंता व सुव्यवस्था लोप पावत चाललेलि आहे तरीही आपण या प्रकरणावर तात्काळ कठोर कारवाई करून या अवैद्य दारू विक्री चालकांना पाय बंद करावे अन्यथा आम्हास महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे उग्र व तीव्र रूपाचे आंदोलन छेडावे लागेल. यानंतर होणाऱ्या परिणामास आपण सर्वांशी जबाबदार राहील.
यावेळी मनसे तालुका संघटक नरेंद्र खापणे, वाहतूक तालुकाध्यक्ष आरीफ शेख, सचिव अखिल शेख, प्रकाश घोटेकर, सुरेखा पंधरे बेबीबाई कोवे मनीषा शेडमाके संगीता मडावी मंगला वाघाडे सोनू भोयर कलाबाई शेडमाके रत्नमाला खाडे सुरेखा टेकाम मीनाक्षी पानघाटे ज्योती पानघाटे सुनिता मांडवकर रेखा परचाके रूपाली परचाके निर्मला काकडे सिंधू काकडे शुभांगी पान घाटे रंजना भारसकरे कल्पना मेश्राम छाया भारसाकरे सुमित काकडे सुनील कोडापे प्रभाकर आमणे अविनाश डावले गजानन पिपडशेड मनोहर उरवते मारुती भोयर संजय पान घाटे पानघाटे दशरथ भारसाकरे पांडुरंग काळे तसेच महाराष्ट्र सैनिक आणि देवधरी गावातील नागरिक उपस्थित होते.
