
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी
हिरामण नगर येथून दुचाकी चोरीला गेली अशी तक्रार दिनेश काशिनाथ बेले रा एकंबा ता हिमायतगर जिल्हा नांदेड यांनी दिला दि. 9/1/2025 रोजी हिरमण नगर निगनुर येथे घरासमोर लावलेली मोटार सायकल mh. AZ .6711 हिरो कंपनीची किंमत 40000 रु चोरट्याने चोरून नेल्या बाबत रिपोर्ट दिला होता
जेवली येथील सुभाष दलपत भ्रम्हणं यांच्या दुकानातील कोणीतरी अज्ञात इस्माने शटर चे लॉक तोडून 16000 रु चा माल चोरी गेल्या बाबत तक्रार दिली होती सदर गुन्ह्यांचा तपास पोहेका रवी गीते करत होते त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीचे आधारे गुन्हायतील आरोपी ओमकार उत्तम खंदारे रा चिंचवडी निगनुर व ओंकार फोफसे रा महागाव यांनी हिरामण नगर येथून मोटार सायकल चोरी करून सदर मोटार सायकल वर बसून जेवली येथे घरफोडी केल्याची माहिती समजली ओमकार उत्तम खंदारे रा चिंचवाडी निगनुर यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता वरिल दोन्ही चोरी केल्याची कबुली दिली आरोपीचे ताब्यातून 1 मोटार सायकल किमत 40000 रु व घर फोडी मधील रक्कम 3500 रु हस्तगत करण्यात आले आहे एक आरोपी फरार आहे सदर ची कार्यवाही मा. कुमार चिंता पोलीस अधिक्षक साहेब यवतमाळ मा. पीयूष जगताप अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ मा उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनात ठाणेदार संतोष मनवर पोउपनी शिवाजी टिपूर्णे पोहेका रवी गिते, पोना अर्जुन राठोड पोका हिंमत जाधव, दत्ता कवडेकर यांनी केली पुढील तपास रवी गिते हे करत आहे
