
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राष्ट्रीय आपत्कालीन जीवन रक्षाप्रणाली अभियान अंतर्गत CPR जागरूकता सप्ताह
केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण व राष्ट्रीय आपत्कालीन जीवन रक्षा प्रणाली प्रशिक्षण अभियाना अंतर्गत श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ तर्फे जिल्ह्यात विविध ठिकाणी CPR ( कारडिओ पलमनरी रिसरसिटेशन )जागरूकता सप्ताह 13 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर पर्यत राबविण्यात आला.
त्यानुसार श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ यांच्यामार्फत महाविद्यालयाचे अधिष्ठाता माननीय. डॉ.अनिल बत्रा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
ह्या सप्ताह चा मुख्य उद्देश CPR बद्दल सामान्य व्यक्ती मध्ये जागरूकता निर्माण करणे होते. सीपीआर ही एक जीव वाचवणारी आपत्कालीन वैद्यकीय प्रक्रिया आहे जी हृदयाची किंवा श्वसनक्रियेची अचानक थांबलेली कार्यक्षमता पुन्हा सुरू करण्यासाठी वापरली जाते .जेव्हा एखाद्या व्यक्तीचा श्वासोच्छ्वास थांबतो किंवा हृदयाचे ठोके बंद पडतात, तेव्हा मेंदू आणि इतर अवयवांना पुरेसा ऑक्सिजन मिळणं थांबते . अशा स्थितीत छातीवर दाब देऊन (chest compressions) आणि कृत्रिम श्वास (rescue breaths) देऊन हृदय आणि फुफ्फुसाद्वारे रक्तप्रवाह आणि ऑक्सिजन पुरवठा टिकवला जातो, ज्यामुळे मृत्यू टाळता येतो .
सदर सप्ताह अंतर्गत श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिसेविका व परिचारिका वर्ग तसेच प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग , जिल्हा पोलीस मुख्यालयातील कर्मचारी, वन विभाग कार्यालयातील कर्मचारीवर्ग, वैद्यकीय अधिकारी वर्ग, जिल्हा यवतमाळ यांना प्रशिक्षण देण्यात आले. दारव्हा येथील श्री. समर्थ गजानन महाराज संस्थान सभागृह जेष्ठ नागरिक संघटन, जिल्हा उपरुग्णालय कर्मचारी वर्ग व नगर परिषद शाळा क्रमांक 2 येथे शालेय विध्यार्थी ह्या सर्वाना CPR प्रणाली बद्दल प्रशिक्षण देण्यात आले.
सदर आरोग्य शिबिरात श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील डॉ. सुरेंद्र भुयार, वैद्यकीय अधीक्षक आणि बधिरीकरण शास्त्र विभागातील डॉ. नितीन नंदनवनकर प्राध्यापक व विभाग प्रमुख , डॉ. रोशन शेंडे, डॉ. सचिन पदमावार,डॉ.अर्चना मेश्राम , डॉ. विनय धकाते, डॉ. भूषण अंबारे, , डॉ. अश्विनी खांबोरकर,डॉ. प्रीती शर्मा, डॉ. सिध्दी राठोड, डॉ. कोमल तापडिया, डॉ. वैश्णवी भोजने , उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. अमर सुरजुशे, डॉ. दुर्गेश देशमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. अरविंद कुळमेथे, आधिपरिचारिका माया मोरे व इंडियन सोसायटी ऑफ अनाइस्थेसियॉलॉजि शाखा यवतमाळ सदस्य या सर्वांच्या सहकार्याने हा सप्ताह सुरळीत पणे पार पडला.
