निवडून आल्यास अभाविपच्या मागण्या विधीमंडळात मांडाव्या

सहसंपादक : रामभाऊ भोयर

आमदार म्हणून निवडून आल्यास अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मागण्या विधिमंडळात मांडव्या, अभाविप राळेगाव शाखेच्या वतीने असे निवेदन प्रा.डॉ. अशोक उईके सर यांना देण्यात आले. राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये राष्ट्रीय शिक्षा नीती-2024 च्या प्रभावी अंमलबजावणी करिता विशेष योजना करावी, स्पर्धा परीक्षा व इतर शासकीय नोकरीसाठी पात्रता परीक्षा शुल्का मध्ये विद्यार्थ्यांना नाममात्र शुल्क असावे. केंद्र शासनाप्रमाणे महाराष्ट्र मध्ये सुद्धा प्रायव्हेट कोचिंग क्लासेस वर व शिक्षणाचे बाजारीकरण थांबविण्याकरीता त्या संदर्भात कोचिंग क्लासेसला विद्यार्थ्यांच्या हिताच्या मार्गदर्शक सूचनांचे सक्तीचे पालन करणे बंधनकारक करावे. गेल्या अनेक वर्षापासून सरकारकडून देण्यात येणारी स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना मिळण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वेळेचा विलंब होत आहे, स्कॉलरशिप तात्काळ मिळणेबाबत यंत्रणा करावी. गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये विद्यापीठ कायद्यात नमूद असलेल्या विद्यापीठ निवडणुकांवर शासनाने स्थगिती दिली आहे. विद्यापीठ कायद्याची पूर्णपणे अंमलबजावणी करत तात्काळ विद्यापीठ निवडणुका लागू कराव्या. अशा विविध मुख्य मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहे. याप्रसंगी विदर्भ प्रांत कार्यकारिणी सदस्य हर्ष वानखडे, यवतमाळ जिल्हा संयोजक यशवंत डांगे, यवतमाळ नगर एस एफ डी प्रमुख पूजा कुडमेथे व यवतमाळ जिल्हा विद्यार्थी विस्तारक श्रुती कान्हेकर उपस्थित होत्या.