
लोकहित महाराष्ट्र उमरखेड तालुका प्रतिनिधी. संदीप जाधव


सर जेजे इन्स्टिट्यूट चे आर्टिस्ट प्रोफेशनल फोटोग्राफी दत्तात्रय कांबळे हे पुणे येथे राहत असून त्यांना कला प्रदर्शनी करण्यात फार उत्सुकता आहे. जेणेकरून गरीब जनजागृती विद्यार्थ्यांना कलेसाठी वाव मिळण्यासाठी प्रत्येक शाळेत एक्जीबिशन भरवण्यात येत आहे. पुण्यामध्ये लातूर धुळे जिल्हा मध्ये त्यांना प्रसिद्धी लाभलेले आहे. म्हणून यवतमाळ नांदेड मध्ये सर्व जिल्ह्यामधील शाळेमार्फत आदेशान्वये एक्जीबिशन भरवण्यात येत आहे. चित्रकला व क्राफ्ट कला प्रदर्शनी घेण्यात येत आहे व त्याचे मार्गदर्शन व कृतीने पटवून देणार आहे. सर्व पालक वर्ग विद्यार्थी वर्ग संपूर्ण महिला वर्ग यांना या प्रदर्शनीचा लाभ घेता यावा अशी इच्छा व्यक्त केली आहे, व ही कला प्रदर्शनी मोफत राहणार आहे.
