
राळेगाव शहरात रस्त्यावरच अस्ताव्यस्त वाहने उभी केली जातात त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ते अरुंद होत असून वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण होतो हे अवैध पार्किंग पोलिसांना दिसत नाही का ? या वाहतूक कोंडीला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. राळेगाव शहरातील मध्यवर्ती सहकारी बँक, ते बस स्टॅन्ड चौक, क्रांती चौक, तसेच कार्यालय ते रावरी पॉईंट, रावेरी पॉईंट बँक ऑफ इंडिया ते क्रांती चौक आदी मुख्य लाईन तसेच मार्केट लाईन या भागात बिनधास्त पणे अवैध पार्किंग केली जात आहे या अवैध पार्किंगमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो त्याशिवाय शुक्रवारला आठवडी बाजार भरत असून बाजाराच्या दिवशी शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्या दिवशी वाहने रस्त्यावर अस्ता व्यस्त उभी केली जात असतात त्यामुळे इतर वाहनांना व नागरिकांना अडचण निर्माण होत असते अशा वाहनधारकांवर कुठल्याही प्रकारची कारवाई होतांना दिसून येत नाही अशा अस्ताव्यस्त वाहन लावणाऱ्यावर पोलासानी कार्यवाही केल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल व रस्ता पूर्णपणे मोकळा राहून नागरिकांना कुठलीही अडचण जाणार नाही मात्र वाहन धारक शहरातील महत्वपूर्ण ठिकाणी चक्क आपली वाहने रस्त्यावर लावत असल्याने रस्त्याने येणाऱ्या वाहनाना व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तेव्हा वाहतूक कोंडीच्या समस्येकडे नव्याने आलेले ठाणेदार अवैद्य पार्किंग करणाऱ्या वाहा नावर लक्ष देतील का असा प्रश्न शहरातील नागरिक उपस्थित करताना दिसून येत आहे.
वाहन चालक काय म्हणतात
दुकानात गेल्यानंतर दुचाकी लावण्यासाठी जागाच नसते. पार्किंगची व्यवस्था करणे गरजेचे आहे
बँक ऑफ इंडिया ते क्रांती चौक या रोडवर मोठमोठी दुकाने व दवाखाने इतर दुकाने सुद्धा आहेत या ठिकाणी आलेल्या रस्त्यावरच उभी वाहने करावी लागतात त्यामुळे पार्किंग साठी जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे
