
प्रतिनिधी:प्रवीण जोशी ,ढाणकी
हिंगणघाट येथे गुरु आनंद गणेश दरबार अध्यात्मिक चातुर्मास २०२२चे आयोजन करण्यात आले होते या चातुर्मासात प.पु.डॉ. उदिताजी म. सा. यांच्या प्रमुख मार्गदर्शनात विविध धार्मिक अध्यात्मिक स्पर्धेचे प्रश्नमंजुष्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या जैन धर्मीय महिला टीमने सहभाग नोंदविला होता या स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडल्या यावेळी धार्मिक क्रिकेट प्रश्नमंजुषा स्पर्धेत ढाणकी येथील जडावकावर महिला टीमने विदर्भातून दुसरा क्रमांक पटकावीत विजेता ठरली आहे या महिला टीम मध्ये ममता कोठारी, नंदा बेदमुथा, ज्योती कोठारी, आरती कोठारी, सोनल भंडारी, सीमा रेदासनी, राखी नाहाटा यांनी सहभाग नोंदविला होता जडावकावर महिला टीमने मिळविलेल्या यशाबद्दल ढाणकी येथील जैन समाजातर्फे कौतुक करण्यात आले.
