

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
शासनाने सुधारित धान्य वितरण प्रणाली अंतर्गत धान्य पुरवठा सुरळीत व्हावा तसेच पारदर्शक व भ्रष्टाचार मुक्त धान्य वितरण प्रणाली व्हावी याकरिता प्रत्येक धान्य दुकानदारांना ई पॉस मशीनद्वारे धान्य वितरण करण्याचे अनिवार्य केले. मात्र मागील काही दिवसांपासून पॉस मशीन मध्ये वारंवार तांत्रिक बिघाड व नेटवर्कच्या अडचणी येत असल्याने इ पॉस मशीन मध्ये सुधारणा करावी अशा मागणीची निवेदन राळेगाव तालुका रास्त भाव दुकानदार तथा केरोसीन विक्रेता संघटना अध्यक्ष रमेश लढे व तालुका उपाध्यक्ष सुरेश पंद्राम यांच्या नेतृत्वात जिल्हा पुरवठा अधिकारी यवतमाळ यांना तहसीलदार राळेगाव यांच्यामार्फत
नुकतेच देण्यात आले.
बहुतांश मशीनमध्ये स्वस्त धान्य दुकानदारांना खाजगी इंटरनेट वापरावा लागतो. ऑगस्ट महिन्यामध्ये तर बऱ्याच ठिकाणी ई पॉस मशीन अजिबात चालल्या नाही. त्यामुळे त्या महिन्याचे धान्य वाटप अजून पर्यंत झालेलं नाही. तालुक्यातील काही मशीन मध्ये बॅटरी व्यवस्थित चार्ज होत नसल्याने तसेच मशीनचे टच व कि पॅड व्यवस्थित काम करीत नसल्याने दुकानदारांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे देखील राशन कार्ड धारकांना खराब नेटवर्कमुळे ट्रांजेक्शन झाल्यास कार्डधारकाचे घरी चकरा मारावे लागतात. याचा विपरीत परिणाम धान्य दुकानदारांच्या दैनंदिन जीवनावर पडत आहे. वरील सर्व अडचणी कार्ड धारक ऐकून घेण्यास तयार नसतात. तुमची मशीन फेकून द्या. दर महिन्याला हेच चाललेलं असतं. आम्ही काम टाकून इथे चकरा माराव्या का ? असे बोलणे ऐकावे लागत आहे. त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी आमच्या निवेदनावर तात्काळ मार्ग काढून संबंधित एन. आय. सी.ला. ई पोस्ट मशीन मध्ये तात्काळ सुधारणा करण्याच्या सूचना द्याव्या व आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे तालुक्यातील रास्त भाव दुकानदार व केरोसीन विक्रेता संघटना राळेगाव यांनी केली आहे.
निवेदन देतेवेळी तालुक्यातील विलास भुजाडे, शुभांगी केवटे, मोरेश्वर चंदनखेडे, राजकुमार जवादे, निवासकर कांबळे, सचिन झोडे, विलास सूर्यपुजारी, वासुदेव चिंचोळकर, सरला चांदेकर, आशाबाई मेश्राम, धनराज लाकडे, रवींद्र गोटेफोडे, पांडुरंग वानखडे, गजानन राठोड, शकुंतलाबाई झोड, नलुबाई धोटे आदी दुकानदार उपस्थित होते.
