प्रधानमंत्री उज्वला योजनेत भरीव योगदानासाठी शंकर गायधने इंडियन ऑइल कडून सन्मानित

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

प्रधानमंत्री उज्वला योजनेतून राळेगाव शहरात व ग्रामीण भागातील पात्र गोरगरीब लाभार्थी कुटुंबांना एलपीजी कनेक्शन मिळवून देण्याच्या शंकर गायधने यांच्या प्रयत्नांची इंडियन आईल कडून दखल घेऊन इंडियन आईल चे नागपूर मंडळ प्रमुख विजया पाठी यांच्या हस्ते व नगराध्यक्ष रवींद्र शेराम उपनगराध्यक्ष जानराव गिरी माजी नगराध्यक्ष माला खसाळे विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे संचालक अरविंद वाढोन कार राजेंद्र तेलंगे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव निलेश ठाकरे एलपीजी क्षेत्र अधिकारी यवतमाळ दीपक कुंभारे प्लांट मॅनेजर एलपीजी आशिष इंगळे प्राचार्य पेस सेंटर किरण कुमरे अन्वी इंडियन संचालक इत्यादींच्या प्रमुख उपस्थितीत शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले
राळेगाव शहरात नुकत्याच झालेल्या सिलेंडर स्फोटाच्या पार्श्वभूमीवर अन्वी इंडन कडून स्थानिक पेस सेंटर येथे आयोजित एलपीजी शिबिरात सिलेंडर हाताळण्याबाबत इंडियन ऑईलच्या अधिकारी वर्गाकडून माहिती देण्यात आली सूत्रसंचालन सचिन कावडे यांनी केले त या एलपीजी सुरक्षा शिबिरात शहरातील व ग्रामीण भागातील गृहिणींनी तसेच हॉटेल मॅनेजमेंट च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.