आई वडील यांना गुरुस्थानी, मानून केले पाद्यपूजन, दुर्गा उत्सव मंडळात आई वडिलांची सेवा


प्रतिनिधी:प्रवीण जोशी ,ढाणकी


ढाणकी येथील हनुमान मंदिरात रामायण कथेचे आयोजन केली होते. या कथेची सांगता दिनांक 3 तारखेला मंडळाच्या सभा मंडपात हा सोहळा पार पडला. यावेळी एक भावनिक करणारा प्रसंग हनुमान मंडळाचे सदस्य रुपेश कोडगिरवार व सौ शिवानी कोडगिरवार यांच्या भावनिक प्रसंगामुळे अवघे दुर्गा उत्सव मंडळाचे सभामंडप भावनिक झाला होता तो प्रसंग सुद्धा तसाच होता आपल्या आईला आणि वडिलांना गुरुस्थानी म्हणून त्यांचे पाद्यपूजन करून जगातील सर्वश्रेष्ठ गुरु आई वडीलच आहे. हे तरुणांसमोर व युवकांसमोर एक आगळावेगळा आदर्श ठेवला.
आई आणि वडील या शब्दाला खूप किंमत आपल्या आयुष्यात आहे हे सांगणे कठीण आहे कारण, फक्त शब्द नसून ते आपले आयुष्यच आहे असे रुपेश कोडगिरवार व सौ शिवानी यांनी केलेल्या पाद्यपूजनामुळे तरी निदर्शनास येते. आई म्हणजे जिने केवळ जन्मच नाही तर आयुष्य दिले हे संपूर्ण विश्व दाखवले तर वडील की ज्यांनी स्वतःचे आयुष्य झिजविले व मुलांच्या आयुष्याला गती दिली एवढे अलौकिक महत्त्व आई-वडिलांचे आपल्या जीवनात असते.