
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील बेंबळा मुख्य कालवा आणि लगत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरिल अतिशय अरुंद पुलामुळे कीन्ही जवादे गट क्रमांक ४२/१ येथे पावसाचे पाण्याचा निचरा होत नाही.त्यामुळे मागील काही वर्षांपासून (बेंबळा मुख्य कालवा झाल्यापासून) शेताचे पिकांचे नुकसान होत आहे.याबाबत वारंवार तक्रार, निवेदन, मागण्या करूनही लक्ष देण्यात आले नाही, सध्यास्थितीत या मुळे लगतचे शेतीक्षेत्र जलमय झाले असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
बेंबळा प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात येणाऱ्या शेताला ओलीताचा लाभ अजूनही होत नाही, नुकसान मात्र हमखास होते. याचा अनुभव दर वर्षी येतो. किन्ही (ज ) येथील प्राथमिक अवस्थेतील पिकांचे नुकसान हे प्रातिनिधीक उदाहरण झाले अनेक ठिकाणी सार्वत्रिक परिस्थिती याच स्वरूपाची आहे.तहसीलदार, कार्यकारी अभियंता बेंबळा कालवे विभाग, प्रोजेक्ट मॅनेजर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ यांना नागरिकांनी वारंवार पत्र,सुचना, निवेदन दिले .परंतु शेतकऱ्यांचे बाबत असंवेदनशील असलेले निगरगट्ट प्रशासन कोणतेही सहकार्य करत नसल्याचा आरोप होतो .दरवर्षी संबंधित शेतकऱ्याचे नुकसान होते.
प्रतिक्रिया 👇🏼 बॉक्स
शासन व प्रशासनाची भूमिका उदासीन
बेंबळा हा अंत्यत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, आम्ही आमच्या सुपीक जमिनी या साठी दिल्या मात्र नियोजन शून्य कामा मुळे व प्रशासनाच्या उदासीन धोरणा मुळे शेतकऱ्यांना याचा लाभ न होता उलट नुकसान होत आहे. अतिशय अरुंद पूला मुळे होत असलेल्या नुकसानी कडे कुणाचे लक्ष नाही. लोकप्रतिनिधीना निवडणुका, विजय -पराजय या शिवाय दुसरे प्रश्नच महत्वाचे वाटतं नाही
संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करावी अशी आमची न्याय मागणी आहे.
सुधीर पाटील जवादे,
बेंबळा प्रकल्प शेतकरी समिती
