

सहसंपादक : रामभाऊ भोयर
यवतमाळ वाशिम लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांच्या राळेगाव विधानसभा क्षेत्रातील दौऱ्यादरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव येथे खासदार म्हणुन निवडुन आल्यानंतर राळेगाव तालुक्यात प्रथमच आगमनानिमित्य वसंत पुरके माजी शिक्षणमंत्री म.रा.व प्रफुल्ल मानकर जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी यवतमाळ यांच्या हस्ते खासदार संजय देशमुख यांच्या संत्कार करण्यात आला. संत्कार प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना मला राळेगाव विधानसभा मतदार संघातून लोकसभेच्या निवडणुकीतून १६ हजार पेक्षा जास्त मताधिक्य मिळाल्याने आपण येथील मतदारावर प्रचंड खुश असून राळेगाव विधानसभा क्षेत्राकरिता विकास निधी कमी पडू देणार नाही, ऐवढेच नव्हें तर शेतकरी, शेतमजुर, बेरोजगार, व्यापारी, या सर्वांचा हिताच्या दृष्टीने राळेगाव येथे सुतगिरणी सुरु करण्यात येईल तसेच येवती डोमाघाट येथे स्वयंपाकाकरिता शेड करून देण्याचे आश्वासन दिले आहे त्यांचे सोनामाता देवस्थान तर्फे सत्कार करण्यात आला. जनतेने ज्याप्रमाणे माज्यावर विश्वास दर्शविला त्या विश्वासास पात्र ठरण्याकरता मी कसोशिने प्रयत्न करेल असे त्यांनी यादरम्यान सांगितले सामान्य लोकांनी देखील आपली कामे हक्काने सांगावी असेही त्यांनी याप्रसंगी नमुद केले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तालुका काँग्रेस कमिटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट कडून खासदार संजय देशमुख यांचे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच स्थानिक कृषी उत्पन्न कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सभापती अँड प्रफुल्ल मानकर. वसंत सहकारी जिनिंग प्रेसिंग वतीने सभापती नंदकुमार गांधी खरेदी विक्री सहकारी संस्थेकडून सभापती मिलिंद इंगोले नगरपंचायत राळेगावच्या वतीने नगराध्यक्ष रवींद्र शेराम उपनगराध्यक्ष जानराव गिरी ग्राम विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने अध्यक्ष सचिन हुरकुंडे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तालुकाप्रमुख विनोद काकडे यांनी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने राजेंद्र तेलंगे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रदीप ठुने छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समितीच्या वतीने अशोक पिंपरे मंगेश राऊत तसेच तालुक्यातील ग्राम विविध कार्यकारी सोसायटी ग्राम पंचायत सरपंच उपसरपंच व सदस्यांकडून नवनिर्वाचित खासदाराचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी माजी मंत्री वसंत पुरके उबाठा जिल्हाप्रमुख किशोर इंगळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. प्रफुल्ल मानकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अरविंद वाढो णकर सर्व सहकारी संस्थांचे अध्यक्ष पदाधिकारी ग्रामीण स्तरावरून आलेले सरपंच सदस्य पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन काँग्रेस शहर अध्यक्ष प्रदीप ठुने यांनी तर आभार प्रदर्शन तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र तेलगे यांनी केले.
