के.बी.एच विद्यालय पवन नगर सिडको येथे लोकनेते व्यंकटरावजी हिरे यांची पुण्यतिथी भावपूर्ण वातावरणात साजरी


महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय पवन नगर नाशिक येथे आज वार सोमवार दिनांक ०३.०७.२०२३. रोजी संस्था संवर्धक लोकनेते व्यंकटरावजी भाऊसाहेब हिरे यांची पुण्यतिथी भावपूर्ण वातावरणात मुख्याध्यापक श्री.यु.बी. देवरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. पी.एच. हिरे सर हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री हिरे पी एच सर व मुख्याध्यापक यू बी देवरे सरआदिनी संस्था संवर्धक लोकनेते व्यंकटरावजी हिरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले. . तसेच विद्यार्थ्यांनी भाषणे केली
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या ज्येष्ठ शिक्षिका एस डी अहिरे यांनी लोकनेते व्यंकटरावजी हिरे यांच्या जीवनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पी एच हिरे सर यांनी लोकनेते व्यंकटरावजी भाऊसाहेब हिरे यांच्या शैक्षणिक,सामाजिक,राजकीय कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस पी पवार यांनी केले व आभार कविता सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू उपस्थित होते.