
ढाणकी शहरातील श्री संत गजानन महाराज यांचा १४७ वा प्रगट दीन भक्तीभावात व उत्साहात साजरा करण्यात आला. गाभाऱ्यातील मूर्तीचे विधिवत पूजन केले व विविध पुष्पांच्या सुंदर पुष्परुपी हारांनी मूर्ती अधिकच सुबक व विलोभनीय दिसत होती. जणू काही विदर्भाचे पंढरपूर म्हणून शेगाव प्रख्यात आहे त्या शेगाव नगरीत आहोत की काय असा भास होत होता. बाहेरील बाजूंनी महिला मंडळींनी विविध रांगोळ्याची आरास काढली होती. यावेळी सकाळच्या रामप्रहरी श्री गजानन महाराजांच्या विविध स्तोत्रांची भजने भोंग्या मधून ऐकायला येत होती. यामुळे सकाळचे रामप्रहरी वातावरण मंगलमय व सुप्रसन्न झाले होते गाभाऱ्यातील महाराजांच्या मूर्तीची यथोचित विधीवत अष्टांग चतुरस्त्र पूजा करून नंतर मंदिरा समोरील मोकळ्या परिसरात विविध धार्मिक ग्रंथ पठनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
महाराज योगी अवस्थेमध्येच प्रकट झाले नेमका जन्म कुठे कसा झाला याची माहिती नाही पण ज्या ठिकाणी दिसले ते ठिकाण म्हणजे एका शुभप्रसंगी पत्रावळीवरील अन्न खाताना एका भक्ताला दिसले तो त्यांचा हेतू किती उदात्त असावा जनसामान्य व मानव जातीचा कल्याण होईल असाच त्यांचा हेतू असावा. अर्थातच अन्न हे परब्रम्ह असून त्याची नासाडी न करता जेवढे आपल्या उदराला लागेल तेवढेच घ्यावे टाकून देऊ नये ही त्यांची शिकवण त्यांचे भक्त आजही पाळतात हे विशेष. व त्यांची प्रामाणिक व नैतिकता त्याचे विचार आज सुद्धा त्यांचे जिथे जिथे मंदिर आहेत तिथे त्यांच्या वचनाचे काटेकोर पालन केल्या जाते. तसेच ढाणकी शहरातील गजानन महाराजांच्या भक्तांनी प्रगट दिनाचे औचित्य साधून गेल्या काही दिवसांपासून आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता मोहीम राबविल्यामुळे मंदिर परिसर अत्यंत स्वच्छ आणि सुंदर झाला होता. यावेळी प्रकट दिनानिमित्त महाप्रसादाचे आयोजन केले होते यावेळी याप्रसंगी महाराजांनी सांगितलेल्या वचनांचे सर्व भक्तांनी पालन केल्याचे दिसले अन्न हे परब्रम्ह आहे हाच हेतू मनात ठेवून सर्वांनी प्रसाद घेतला. पण कुठेही अन्न वाया जाणार नाही याची दक्षता भक्तांनी व मंदिराच्या वतीने घेण्यात आली. इतके दिवस झाले महाराज होऊन गेले पण त्यांनी सांगितलेला माणूस धर्म अन्न हे परब्रम्ह आहे हे वचन आजही जनमानसात कायम आहे. या कार्यक्रमाच्या वेळी विष्णूदास वर्मा, विजय जयस्वाल, मंगेश चौधरी, श्रीनाथ येरावार, पंकज कोडगीरवार,किशोर चिन्नावार, गजानन मामीडवार व समस्त शहरवासीयांचे सहकार्य लाभले.
