
सहसंपादक : रामभाऊ भोयर
:-77 राळेगांव विधानसभा मतदार संघ अंतर्गत येणाऱ्या सर्व नागरीकांना कळविण्यांत येते की, मतदान सुरळीतपणे पार पाडण्यासाठी व गैरसोय टाळण्याकरीता आपले नांव दि.30.08.2024 च्या प्रसिध्द झालेल्या मतदार यादीत समाविष्ट असले बाबत खात्री करावी. सदर यादी पाहण्या करीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचेकडे उपलब्ध आहे. आपले नांव मतदार यादीत नसल्यास तात्काळ आपल्या गावातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) मार्फत किंवा ऑन लाईन साईट NVSP वर नमुना 6 (सहा) त्वरित भरुन घ्यावा. तसेच मतदार यादीत आपले नांवात दुरुस्ती असल्यास मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) मार्फत किंवा ऑन लाईन साईट NVSP वर नमुना-8 (आठ) त्वरीत भरुन घ्यावा. तसेच मतदार यादीचा भाग क्रमांक व अनुक्रमांकाची नोंद आपणाकडे ठेवावी. असे आवाहन विशाल खत्री (भा.प्र.से.), निवडणूक निर्णय अधिकारी 77 राळेगांव विधानसभा मतदार संघ यांनी केले आहे.
