
महागाव प्रतिनिधी :- संजय जाधव
24 जून रोजी दिग्रस येथे शिवसेना युवासेना- विद्यार्थीसेना-महिलाआघाडी यांचे वतीने गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळा पार पडला. या सोहळ्यास राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.संजय भाऊ राठोड उपस्थित उमरखेड तालुका अंतर्गत येणाऱ्या पिंपळवाडी तांडा येथील आदित्य विनोद चव्हाण यांना दहावी परीक्षेत ९०%टक्के प्राप्त केल्याने अन्न औषध प्रशासन मंत्री तथा वाशिम यवतमाळ पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या हस्ते आदित्य विनोद चव्हाण व त्यांच्या आई-वडिलांचे दिग्रस येथे सत्कार करण्यात आले सुमारे ५५० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करत त्यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी दहवी व बारावी आणि NEET मध्ये प्रथम आलेल्या तीन विद्यार्थ्यांना स्मार्ट वॉच व इतर विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे व इतर वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थितांशी मा. संजय भाऊ राठोड यांनी संवाद साधला. शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनेक योजना राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेऊन विविध क्षेत्रात नावलौकीक मिळवावा व देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपलं महत्वपूर्ण योगदान द्यावे असे आवाहन मा. संजय भाऊ राठोड यांनी विद्यार्थ्यांना केले. या प्रसंगी विद्यार्थी त्यांच्या कुटुंबातील सदस्य व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
