आष्टोना सरपंच सचिवाची शाळा सभापतीशी उद्धटपणाची वागणूक, लहान विद्यार्थ्यांच्या जिवितहानीची शक्यता

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील आष्टोना या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची एक खोली जिर्णावस्थेत झाल्याने त्या खोलीचे निर्लेखन करण्यात येणार असल्याने ती जागा मोकळी करण्यात आली आहे.त्यामुळे शाळेचा तो भाग खुला झाल्याने त्या परिसरात शाळेच्या वेळेत आणि इतर वेळात सुद्धा मोकाट कुत्री, जनावरांचा वावर असल्याने त्या परिसरात लघु विश्रांती, दिर्घ विश्रांतीच्या सुट्टीत एखाद्या विद्यार्थ्याला दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे वाटत असल्याने या वर्ग खोलीचे बांधकाम ताबडतोब मार्गी लावण्यासाठी सरपंच आणि सचिवांना तोंडी विनंती करण्यात आली.सोबतच सरपंच /सचिव यांना निवेदन सुद्धा देण्यासाठी गेलो असता निवेदन घेण्यास नकार दिला आणि मला तुझ्याशी काय होते कुठे तक्रार द्यायची तर दे ,असे बेकायदेशीरपणे उत्तर देऊन माझ्या पदाचा अपमान केला. करिता विद्यार्थ्यांचा भविष्याचा विचार करून 1/8/2024 रोजी गटविकास अधिकारी राळेगाव यांना निवेदन दिले असून ताबडतोब हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी या लेखी निवेदनाद्वारे आष्टोना शाळा व्यवस्थापन समिती सभापती दिनेश पारखी यांनी केली असून या लोकशाहीच्या काळात जनतेची सेवा करणाऱ्या एका लोकप्रतिनिधीनी दुसऱ्या लोकप्रतिनिधीला दिलेल्या बेजबाबदार उत्तरामुळे पालक वर्ग चिंता व्यक्त करत आहे.