
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील रिधोरा गावालगत असलेल्या लाडकी नाल्यावरुन लाडकी येथिल अन्नाजी बाळकृष्ण गुडदे वय ५० वर्षं हे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सविस्तर वृत्त असे लाडकी नाला हा कमी उंचीचा असल्यामुळे लाडकी येथिल नागरिकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत असते वेळोवेळी या बाबत प्रशासनाला माहिती देऊन सुध्दा या गावच्या नाल्या कडे जाणुन बुजून प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे लाडकी येथिल नागरिकात बोलल्या जात आहे तर याही आधी एक दुचाकी सवार थोडक्यात बचावला होता दुचाकी या नाल्यावरुन पुराच्या पाण्यात वाहून गेली पण दुचाकी सवार थोडक्यात बचावला होता सदर अशा एक ना अनेक या नाल्यावर घटना घडुन सुध्दा या कडे ना प्रशासन लक्ष्य देत ना लोक प्रतिनिधी लक्ष्य देत सदर या नाल्यावरुन अन्नाजी बाळकृष्ण गुडदे हे वडकी वरुन लाडकी कडे येत असता पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली असल्याने गुडदे परिवारावर मोठा दुःखांचा डोंगर कोसळला आहे सदर या घटनेची माहिती मिळताच राळेगाव तहसीलदार डॉ रविंद्र कानडजे व वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनायक जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली होती सदर त्यांच्या पश्चात एक मुलगी व दोन मुले विवाहित असून बरास असा आप्त परिवार आहे
