
प्रतिनिधी ढाणकी :प्रवीण जोशी
उमरखेड आगाराच्या अनेक बसेस भंगार झाल्या आहे. भर रस्त्यात कोठेही बंद पडतात. प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागते. उमरखेडचे आगार व्यवस्थापक हे आपल्या कामाध्ये गुगं राहतात तसेच. उमरखेड यवतमाळ, उमरखेड ते नागपुर हे फेऱ्या वेळेवर जात नाही. अशी चर्चा प्रवाशी वर्ग करताना दिसत आहेत. नाईलाजाने अवैध वाहतुकीचा आधार घ्यावा लागते.परिणामी प्रवास करणाऱ्या लोकाचे हाल होत आहे. तसेच उमरखेड ढाणकी सटल सेवा अचानक पणे हरदडा फाट्यावर बंद पडली. एखादा आजारी व्यक्ती जर त्यात प्रवास करत असेल आणि त्याला शहरात दवाखान्यात जायचे असेल तर?तो मुळीच वेळेवर योग्य त्या ठिकाणी पोहोचणार नाही परिणामी रुग्ण दगावु सुद्धा शकतो. तेव्हा उमरखेड आगाराच्या नादुरुस्त बससे रस्त्यावर धावतात असे असताना एसटीचा प्रवास धोका नाही जीवास हे ब्रीदवाक्य मंडळाचे मांडले खरे ठरेल का? उमरखेड आगार हे मध्यवर्ती बस्थानक ओळखले जाते पण आज परीस्थिती फार बिकट झाली असून अनेक लांब पल्याच्या गाड्या रद्द होतात अर्ध्या शेड्युल परत होते पुर्ण फेरी कधीच होत नाही. बहुजन हितया ,बहुज सुखय या वाक्याची फज्जा होत आहे तरी यवतमाळचे विभाग नियंत्रक गोंजारी साहेब यांनी याकडे लक्ष घालुन प्रवाशाना होणारा मानसीक त्रास दुर करावा अशी मागणी प्रवाशी करीत आहेत.
