भारतीय जनता पार्टी पोंभुर्णाचे वतीने गुणवंतांचा सत्कार


पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी :- आशिष नैताम


आज दिनांक 13/07/2023 ला भारतीय जनता पार्टी पोंभुर्णाचे वतीने पोंभुर्णा तालुक्यातील गुणवंत विद्यार्थीचा सत्कार घेण्यात आला. यावेळी 12 वी मध्ये मयुरी चंद्रशेखर बोरकुटे 73.17 टक्के , चैताली संजय पोतराजे 70.67 टक्के, श्रुती संदीप इटकेलवार 67.67टक्के घेऊन तालुक्यात अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय आले. पोंभुर्णा तालुक्यात 10 वीच्या परीक्षेत प्रज्ज्वल संजय बोबाटे 93.40टक्के, अंजली अनिल भडके 93.40टक्के साक्षी सागर देशमुख 90.40टक्के याप्रमाणे प्रथम द्वितीय तृतीय याप्रमाणे क्रमांक पटकवले. यावेळी विद्यार्थी यांना शाल श्रीफळ पुष्पगुछ पुस्तक भेटवस्तू देऊन सत्कार करून शुभेच्छा देण्यात आली. यावेळी अल्का आत्राम भाजपा महामंत्री प्रदेश महामंत्री महिला मोर्चा, सुलभा पीपरे नागराध्यक्ष, ऋषी कोटरंगे अध्यक्ष शहर, ओमदेव पाल महामंत्री, ईश्वर नैताम महामंत्री हरीश ढवस महामंत्री, विनोद देशमुख माजी उपसभापती, महेश रणदिवे, दर्शन गोरानटीवर, नगरसेवक मोहन चलाख उपध्यक्ष, नंदा कोटरंगे, आकाशी गेडाम, रोहिणी ढोले, शारदा गुरनुले नगरसेविका राजू ठाकरे, गंगाधर नानगिरवार, ठाकरे सर उपस्थितीत होते.