स्वातंत्र्य दिनानिमित्त केले माजी सैनिकांनी रक्तदान….


सहसंपादक : रामभाऊ भोयर


राळेगाव :- शुक्रवार दिनांक 16 ऑगस्टला स्वातंत्र दिनाचे अवचीत साधुन भारतीय माजी सैनिक कल्याण संघटना सदस्यांनी शासकीय ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे माजी सैनिकांनी रक्तदान करून दिला समाजाला एकतेचा संदेश.
जशी रक्ताची जाती, धर्म नाही तशिच फौजीला पण जात धर्म नसतो. त्यामुळे जे रक्तदान माजी सैनिकांनी केले त्या रक्ताचा उपयोग फक्त मानव समाजालाचं
होईल रक्त ज्या प्रमाणे सर्व रुग्णासाठी समान कार्य करत असते ते कोणालाही कमी जास्तं लेखत नाही स्त्री असो की पुरुष सारखाच रिझल्ट देते त्याच प्रमाणे एक सैनिक सुध्दा देशात एकता, अखंडता प्रस्तापित करण्यासाठी परिश्रम घेतो.. कधी शांती दुत म्हणून तर कधी रक्षक बनून सैनिकाला सर्वोपरी प्रथम आणि शेवट पणं देशचं असतो. हेचं लक्षणं रक्तात पणं असते त्यामुळे माजी सैनिकांनी हे रक्तदान शिबिर घेऊन स्वातंत्र दिना निमित्त एकतेचा संदेश इथे दिला आहे.
रक्तदान हेचं महादान असल्यामुळे ह्या शिबिराचे आयोजन भारतीय निमलष्करी दल माजी सैनिक कल्याण संघटनेचे अध्यक्ष जगत राजाराम चव्हाण आणि मेजर जीवन कोवे ह्यांचा पुढाकाराने घेण्यात आले.
ह्या शिबिरात रक्तदानकरिता माजी सैनिक गजानन ठाकरे, विकी संतोष मेश्राम, दिनेश गुणवंत कोळपे, गणेश नामदेव राखोडे, मेजर अरुण बाराहाते, रामदासजी धुर्वेसाहेब , कैलास किसनाजी कोडापे, भास्कर देविदासजी कोवे, मेजर इंद्रजीत लाभाने अनिकेत विनोदराव अनसकर, तेजस प्रभाकर डाखोरे, चेतन प्रेमराज कन्नाके, सचिन प्रकाशराव कदम, आशिष लक्ष्मणराव वनकर, व माजी सैनिक मेजर जीवन देविदासजी कोवे, यांनी रक्तदान करून समाजाच्या सामान्य घटकाला एक शोर्य दिनाचा सन्देश देतं प्रेरणा व देश्याप्रती आपली जबाबदारीची आठवण ह्या शिबिरातून करून दिली विशेष म्हणजे भारतीय सैन्या प्रति जनतेची निष्ठा व जनते प्रती सैनिकांची सेवा ह्यातून दिसून येते.. माजी सैनिक मेजर जीवन कोवे राळेगाव विधानसभा मतदार संघाचे ह्या संघटने कडून उमेदवार असल्यामुळे “ऐ वतन तेरे लीए.. दिलं दिया है अब खून भी देंगे” ही सेवा भावी ऋती समोरं ठेवून हे सर्वांना प्रेरणा दाई ठरेल ह्या अपेक्षेने रक्तदान शिबिर घेण्यात आले .