
सहसंपादक -रामभाऊ भोयर
भंडारा तालुक्यातील चिखलपहेला येथील रास्त भाव दुकानदार संजीव मुरारी भांबोरे यांच्या रास्त भाव दुकानात गुढीपाडवा ते बोधिसत्व विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती दिनाचे औचित्य साधून आनंदाचा शिधा वाटपाचा कार्यक्रम अंतोदय व प्राधान्य कार्ड धारकांना 100 रुपयात चार वस्तू चणाडाळ ,पामतेल, रवा, साखर, महाराष्ट्र शासनाने देण्याचे जाहीर केले होते .त्यानुसार कार्डधारकांना आज दिनांक 7 एप्रिल 2023 रोज शुक्रवारला आनंदाचा शिधा किडचे कार्डधारकांना चिखलपहेला येथील सरपंच संदीप संयाम यांचे हस्ते वाटप करण्यात आले .यावेळी सामाजिक कार्यकर्ते विनोद भोयर , रवींद्र केवट व कार्डधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
