अनेक गावात दारूबंदी तर नाहीच पण अवैध दारु विक्री गावोगावी धुमधडाक्याने सुरुच?


राळेगांव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

पोलिस स्टेशन राळेगांव च्या पाठबळामुळे गावोगावी अवैध देशी दारु विक्री धुमधडाक्याने सुरु चं असल्याचे अनेक तक्रारी अंती निदर्शनास येत आहे हे विशेष.
गावात शांतता राहावी,कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या साठी अवैध देशी दारू विक्री सह अन्य अवैध व्यवसाय नकोच.पण मात्र प्रशासनाच्या दारुबंदी धोरणाला पोलिस स्टेशन राळेगांव च्या वतीने तिलांजली देण्यात येत आहे.
पोलिस स्टेशन राळेगांव च्या अंतर्गत साठ च्या वर गावं आहेत. कर्मचाऱ्यांचा अनुशेष तर आहे.कामं भरपूर पण तक्रारी चा तपास करायला वेळ नाही.फक्त तक्रार कर्त्याचे थातूरमातूर च समाधान करण्यात धन्यता मानत आहेत.
वाऱ्हा येथील महिलां नी आमच्या गावात अवैध देशी दारु विक्री नकोय म्हणून पोलिस स्टेशन राळेगांव वर धडकून तक्रार निवेदन दिले. पोळा,गणपती उत्सव व समोर सर्व महत्वाचे सण आहे.त्या अनुषंगाने मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालणे,नाहक अश्लील शिवीगाळ करणं,वादविवाद भांडणं यामुळे महिला भगिनी त्रासून गेल्याने, वारंवार पोलिस स्टेशन राळेगांव ला लेखी तक्रार देतात.पण फायदा मात्र नाही.उलट अवैध देशी दारु विक्रते तक्रार कर्त्याना धमक्या देतात अशी च चर्चा ऐकायला मिळते. आणि इतर विभागातील वरिष्ठ अधिकारी सुध्दा या गंभीर विषया कडे का कानाडोळा करतात?
तेच कळत नाही.
राळेगांव शहरात तर राजीव गांधी क्रिडा संकुल,आदिवासी मुलींच्या वसतिगृहा जवळ च अवैध देशी दारु विक्री व संगणक चकरी अवैध व्यवसाय सुरु आहे.आणि याला लागूनच मोठ्या शासकीय अधिकाऱ्यांचे शासकीय निवासस्थान आहे.
शहरातील प्रत्येक प्रभागात अवैध देशी दारु विक्री फक्त भरपूर आर्थिक लाभासाठी चं सुरु आहे आणि या सोबत च मोबाईल वरली मटका,अवैध गोवंश तस्करी सह वाहतूक,अवैध देशी दारु वाहतूक पोलीस स्टेशन राळेगांव च्या आर्थिक आशिर्वादाने सुरु आहे
हे विशेष…….