
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
सविस्तर वृत्त असे की ग्रामपंचायत सराटी येथील जिओ चे टॉवर चार वर्षापूर्वी उभे करण्यात आले परंतु गावातील अंतर्गत राजकरणामुळे जिओ टॉवर च्या जागे बद्दल गावातील लोकांमध्ये अंतर्गत वाद झाले व प्रकरण न्यायालयाच्या अधीन गेले त्यानंतर गावातील सरपंच व गावातील पुढारी लोकांनी अंतर्गत वाद विवाद विसरुन व सराटी जवळील लोणी येथील काही लोकांनी सराटी येथील गावातील सुभाष पाटील तौडवाल व संतोष तौडवाल यांच्या शेतात उभे असलेले जिओ टॉवर चालू करण्याबाबत लोणी येथील रंजीत कोरडे व संदीप वारेकर विनोद भोकटे यांनी मध्यस्थी करून सराटी येथील जिओ टॉवर बंद असल्याने सराटी येथील लोकांची भेट घेतली दिगंमत्बर लडस व रमेश लढे व मदन गोपाल ठाकरें व संतोष आत्राम सरपंच यांची भेट घेऊन जिओ टॉवर थे प्रकरण न्यायालयात चालू होते लोकांची मध्यस्थी झाल्यामुळे ते प्रकरण न्यायालयातून काढून टाकण्यात आले. याची संपूर्ण माहिती वणी येथील जिओ टॉवर कार्यालय मध्ये कागद पत्रासाहित कळवण्यात आले हा सगळा कार्यकाळ होऊन जवळ पास तीन ते चार महीने झाले तरी सुद्धा जिओ टॉवर ऑफिसचे कर्मचारी उडवा उडवीचे उत्तरे देत असून त्यावर अजून ही काही कार्यवाही करण्यात आली नाही लोणी, सराटी, बोराटी व बंदर येथील लोकांचे मोबाईल शोभेची वस्तु झाले आहे या आगातील जंगला मध्ये वाघाचा वावर आहे लोकांना मोबाईल नेटवर्क मुळे अतिशय अवघड झाले आहे गावातील लोकांना अडचणी च्या वेळी कोणाला संपर्क सुद्धा करता येत नाही. लोणी, सराटी, बोराटी व बंदर ही चार ही गाव फॉरेस्ट कार्यालयाच्या अंदर वेलात त्या मुले त्या भागात जंगली प्राण्याचा सुळसुळात चालू च राहतो अश्या वेळेस आपण मदती साठी कोणाला ही संपर्क साधू शकत नाही. या सगळ्या बाबी आम्ही जिओ टॉवर च्या कार्यालयाला सांगून अजूनही मोबाइल नेटवर्क काही सुद्धा नाही.
