
मार्कंडेय पोदार लर्न स्कूल मंदर वणी मध्ये वार्षिक स्नेह संमेलन उत्साहवर्धक वातावरणात पार पडला .कार्यक्रमप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मान. आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार आमदार वणी मारेगाव झरी विधानसभा क्षेत्र प्रमुख पाहूणे म्हणून मान. नितीन हिंगोले सर, उपविभागीय दंडधिकारी वणी , मान. रमेशजी सुंकुरवार अध्यक्ष श्री मार्कंडेय शिक्षण संस्था वणी ,मान. धंनजय मुक्तेवार, उपाध्यक्ष श्री मार्कंडेय शिक्षण संस्था वणी , मान. राहूल आर सुंकुरवार, सचिव श्री मार्कंडेय शिक्षण संस्था वणी
मान. सौ. लालिताताई संजिवरेड्डी बोदकुरवर, समाजसेविका महिला संघ वणी, मान. सौ .वर्षाताई डी मुकतेवार ,सदस्या श्री मार्कंडेय शिक्षन संस्था वणी, मान. कुणाल आर सुंकुरवार, शाळेचे मुख्याध्यापक मान. आमिन नुरानी सर ,मान . कविताताई आर सुंकुरवार, मान. सौ. प्राचीताई सुंकूरवार , मान.सौ. पूनमताई कुनाल सुंकुरवार इत्यादि मान्यवर उपस्थीत होते.
कार्यक्रमाची सुरवात दिपप्रज्वलन माता सरस्वतीच्या प्रतिमेच्या फोटोला हार अर्पण करून करन्यात आले. अध्यक्षाचे स्वागत संस्थाध्यक्ष यांचे हस्ते पुष्प गुच्छ देऊन करण्यात आले.मुख्याध्यापक यानी शाळेविषयी वर्षभर झालेल्या शैक्षणिक सास्कृतिक कला विषयी सविस्तर अहवाल व्हिडिओ फित द्वारे दाखविण्यात आला, संस्था अध्यक्ष यानी शाळेच्या प्रगती तसेच शैक्षणिक सामाजिक कला उपक्रमाबाबत विद्यार्थ्यांना अधिकाधिक सहभाग नोंदविण्याकरिता भाग पाडणे या मुळे त्यांच्या कला गुणांना वाव मिळेल त्यामुळे त्यांचे भविष्य उज्वल होईल हे संस्थेचे ध्येय आहे. हाच प्रसंग लक्ष वार्षिक स्नेह संमेलन 2024 म्हणून साजरा होईल त्याच बरोबर विध्यर्थी सोबतच माता पालकानी सुद्धा नृत्य कलेत सहभाग नोंदविला हे एक विशेष होतें.यामुळे पाल्याच्या चेहऱ्यावरचे हाव भाव त्यांना प्रोत्साहित करणारे होते विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कला गुणांचे नृत्य कला द्वारे तसेच माई सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक कार्यात स्त्री शिक्षणाचे महत्व या विषयावर नाटक सादरीकरण करण्यात आले.
प्रसंगी विध्यार्थी समस्त पालक वर्ग या कार्यक्रमाला उपस्थित होते संपूर्ण सहभाग नोंदविणाऱ्या विद्यार्थ्याची कला अलौकिक होतें.
कार्यक्रमाचे संचालन गुडिया पाठक /निशा रियाझ यानी केले तर आभार शाळेचे मुख्याध्यापक मान आमिण नुरानि यानी मानले कार्यक्रम यशस्वितेकरिता सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी अथक परिश्रम घेतले.
