
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
दि. १८/०६/२०२४ रोजी जाहिर झालेल्या अन्न पुरवठा निरिक्षक परीक्षा २०२३ निकालात यवतमाळ येथील तुषार संगिताताई अरुणराव मानकर हा गुणानुक्रमे पहिला आला आहे.
शालेय जीवनापासून शिष्यवृत्ती, नवोदय, दहावी-बारावी अशा परिक्षेत यश संपादत महाराष्ट्र इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे या नामांकित महाविद्यालयातून अभियांत्रिकी पदवी घेतली. नामांकित कंपनीत ८.५०लाख वार्षिक पॅकेजची नोकरी न स्विकारता भारतीय प्रशासकीय सेवेच्या तयारीसाठी बार्टीसारख्या संस्थेच्या शिष्यवृत्ती मिळवत दिल्ली येथे राहून परीक्षेची तयारी केली. अनेकदा पूर्व-मुख्य परीक्षा व मुलाखत असा प्रवास होऊनही अपेक्षित यश मिळाले नाही. अपयशाने खचून न जाता कोरोनानंतर पुणे येथे राहून एमपीएसपी, राज्यसेवा, इतर परीक्षा देण्यास सुरुवात केली.
विविध स्पर्धा परिक्षेत यश मिळवत जि. प. यवतमाळ लेखालिपिक पदासाठी परीक्षेत निवड यादीत प्रथम, यवतमाळ जिल्हा तलाठी पदभरती निवड यादीत बिगर राखीव प्रवर्गात पाचवा व इतर मागास प्रवर्गात प्रथम आला.नुकत्याच जाहीर झालेल्या अन्न पुरवठा निरिक्षक परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रातून बिगर मागास प्रवर्गातून सर्वाधिक गुण घेत प्रथम आला आहे.
त्याचे वडील मूळचे घाटंजी तालुक्यातील इंझाळा या गावचे रहिवासी असून जि. प. यवतमाळ अंतर्गत सेवा निवृत्त सहाय्यक लेखाधिकारी व आई गृहिणी आहे. विविध मैदानी खेळात तो पारंगत आहे.
तो आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, कुटुंबीय, मार्गदर्शक शिक्षक व मित्र परिवाराला देतो.