बोर्डा गावात आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन,युवासेना तालुका प्रमुख भूषण बुरीले यांचा अभिनव उपक्रम

प्रतिनिधी:कल्पक ढोरे,वरोरा

शिवसेना पक्षप्रमुख ,मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजपयोगी उपक्रम राबविण्यात आले.शिवसेना वरोरा तालुका तर्फे आयोजित भव्य नेत्र तपासणी शिबीर व आरोग्य तपासणी शिबिर शिवसेना जिल्हा प्रमुख नितीनभाऊ मत्ते यांच्या मार्गदर्शनात तसेच शिव सेना तालुका प्रमुख मुकेशभाऊ जीवतोडे यांच्या नेतृत्वात बोर्डा ग्रामपंचायत येथे उदघाटन करण्यात आले.यावेळेस युवासेना जिल्हा चिटणीस चंद्रपूर मनिषभाऊ जेठानी,युवासेना तालुका प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य भूषण बुरेले,ग्रामपंचायत सदस्य हिवरकर ताई,ग्रामपंचायत सदस्य उमेश देशमुख,संगीत रामटेके, प्रकाश कुरेकार व सर्व शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.

बाळासाहेबांच्या शिकवणी प्रमाणे 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण हा वसा पुढे नेत वरोरा शहरातील विविध भागात आरोग्य शिबिराचे आयोजन करून सर्वसामान्यांना लाभ देण्याचे काम करण्यात आले .त्याचाच एक भाग म्हणून बोर्डा गावातील वॉर्ड क्रमांक 3 चे ग्राम पंचायत सदस्य भूषण बुरीले यांच्या तर्फे 1 ऑगस्ट रोजी बोर्डा गावातील जिल्हा प्राथमिक शाळेत आरोग्य तपासणी शिबिर व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात आरोग्य तपासणी करून औषधे मोफत देण्यात आल्या.एकुन 240 रुग्णांनी नेत्रतपासणी करीत डोळ्यांचा चष्मा देखील अगदी माफक दरात देऊन सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला आहे.या शिबिरात बोर्डा गावातील सर्व वयोगटातील युवकांनी सहभाग घेत शिबिराचा लाभ घेतला .डोळ्याच्या समस्या असणाऱ्यांना पुढील उपचार लवकरात लवकर उपलब्ध करून देऊ असे आश्वासन बोर्डा ग्राम पंचायत चे सदस्य भूषण बुरीले यांनी जनतेला दिले.बोर्डा गावातील स्वयंघोषित नेत्यांनी आज वर असे कोणतेही उपक्रम राबविले नाही परंतु युवासेनेचे तालुका प्रमुख यांनी नागरिकांच्या सेवेत हा उपक्रम राबविल्याने गावातील वृद्धांनी त्यांचे आभार मानले.व स्वयंघोषित नेत्यांना चपराक दिली.

या उपक्रमात युवासेनेचे पदाधिकारी ,भूषण बुरीले ,विनय पागरूत , सचिन पवार ,संगीत रामटेके,शुभम साखरकर ,जगदीश कापसे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते