
महागाव प्रतिनिधी :- संजय जाधव
दिनांक 30/4/24 रोजी पुसद तालुक्यातील वसंतपुर (सेलू) येथे बंजारा समाजातील प्रसिद्ध साहित्यिक याडीकार म्हणून सर्वदूर परिचित असलेले, श्री. पंजाबराव चव्हाण ह्यांच्या मातोश्री स्व. सुंदलबाई चव्हाण ह्यांचे मागील दोन दिवसा पूर्वी झालेल्या दुःखद निधन झाले होते.आज त्यांच्या तिसऱ्या दिवसा निमित्त आयोजित शोकसभेत आ.श्री. इंद्रनील नाईकसाहेब यांच्या वतीने उपस्थित राहून शोकाकुल चव्हाण परिवारातील सदस्यांची सांत्वन पर भेट घेतली.
श्री. पंजाबराव चव्हाण ह्यांच्या लिखाण आणि चिंतनाचा केंद्रबिंदू च आई होती. आपल्या आत्मचरित्राला, याडी म्हणून शीर्षक देवून सर्वत्र याडीकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंजाबराव चव्हाण ह्यांच्या चेहऱ्यावर याडीच्या कायमच्या जाण्याचे दुःखद भाव स्पष्टपणाने जाणवत होते.ह्या शोक सभेत परिसरातील बंजारा बांधवांसह इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
