झाडगाव येथे शेतातील मोटरपंपाची चोरी

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

राळेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या झाडगाव येथील शेतकरी किशोर बाबाराव वाघमारे वय वर्षे 40 यांच राळेगाव ते वडकी रोडवर झाडगाव शेतशिवारात चार एकर ओलीताची शेती आहे संध्या पावसाने दडी मारल्याने शेतकरी हा शेतात ओलीत करत होता .ओलीत करून शेतकरी हा आपल्या घराकडे गेला असता सकाळी किशोर हा आपल्या शेतात आला असता त्याला विहरिवर मोटर आढळून आली नाही तसेच पाईपची सुद्धा कापनी करन्यात आली सदर शेतकरी हा राळेगाव पोलिस स्टेशन येथे जाऊन रितसर तक्रार करन्यात आली अज्ञात आरोपी बदल राळेगाव ठान्यात गुन्हा दाखल करण्यात आला राळेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार संजय चोबे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार रत्नपाल मोहाडे पुढिल तपास करीत आहे.