भारतीय स्टेट बँकेच्या व्यवस्थापकाना दिला ढाणकीकरानी निरोप . कारकिर्दीत शेतकऱ्यांसाठी केलेल्या भरीव कामगिरीने उपस्थित झाले भावनिक


यवतमाळ
प्रतिनिधी ::प्रवीण जोशी


भारतीय स्टेट बँक मधील कर्मचाऱ्यांचा चांगला अनुभव कदाचित खूप कमी लोकांनी अनुभवला असेल.
मात्र भारतीय स्टेट बँक शाखा ढाणकी येथील शाखा प्रबंधक अतुल देशपांडे यांच्या कारकिर्दीत सर्वसामान्य तसेच शेतकऱ्यांना अतिशय चांगला व सुखद अनुभव आल्याने त्यांना आज निरोप देताना उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा अलगद ओलावल्या.
गेल्या वर्षीच त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला होता. ढाणकी शहराला अंदाजे 30 ते 40 खेडे जोडलेले असुन येथील सर्व लोकांचा आर्थिक व्यवहार व शेतकऱ्यांचे पीक कर्ज भारतीय स्टेट बँक शी निगडित आहेत.
जेव्हापासून शाखा व्यवस्थापक देशपांडे यांनी पदभार स्वीकारला तेव्हापासून बँकेचा व्यवहारा चा आलेख हा चढताच राहिला आहे. गेल्या वर्षभरात भारतीय स्टेट बँक शाखा ढाणकी ही थकित कर्जबाकी वसुलीमध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये क्रमांक एक वर होती. तसेच लोकांना बचतीची सवय लागावी व बँके मध्येही ठेवी वाढाव्या या उद्देशाने आपल्या कर्मचाऱ्यांना घरोघरी पाठवून व स्वतः जाऊन अमृत कलश योजनेमध्ये नागरिकांना पैसे गुंतवण्यासाठी प्रोत्साहित केले आणि या मधून अंदाजे 21 कोटी रुपये च्या ठेवी बँकेमध्ये जमा झाल्या होत्या आणि विशेष म्हणजे 15 मे रोजी या एकाच दिवशी अंदाजे दहा कोटी रुपयांच्या ठेवी ह्या भारतीय स्टेट बँक शाखा ढाणकी मध्ये जमा झाल्या याचे सर्व श्रेय शाखाप्रबंधक अतुल देशपांडे यांनाच जाते.
शेतकऱ्यांशी त्यांचा असलेला सुसंवाद यामुळेच देशपांडे हे शेतकऱ्यांना 21 कोटी रुपयांपर्यंतचे पीक कर्ज देऊ शकले. एकंदरीत त्यांच्या कारकिर्दीमध्ये नागरिक तसेच शेतकऱ्यांना कोणतीही अडचण उद्भवली नाही. आज रोजी त्यांची पदोन्नती होऊन ते असिस्टंट जनरल मॅनेजर या पदाला पात्र ठरले. त्यामुळे ढाणकी शहरातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी त्यांच्यासाठी छोटेखानी निरोप समारंभ आयोजित केला होता. विशेष म्हणजे त्यांना निरोप देताना सर्वांच्या डोळ्यात अलगद पाणी तरळले होते.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती उमरखेड चे सभापती बाळासाहेब चंद्रे पाटील, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व प्रदेश समन्वयक अमोल तुपेकर, सोसायटीचे संचालक शिवाजी वैद्य, सामाजिक कार्यकर्ते गजानन मिटकरे, व्यापारी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रुपेश भंडारी, मोक्षधाम सेवा समितीचे अध्यक्ष सुभाष बाबू कुचेरिया, अवधूतराव चद्रे, राहुल चंद्रे, नारायण दूधलवाड, अभिलाष शेवाळकर, हमीद भाई, अजीज खान पठाण, खंडेराव लकडे, व परिसरातील शेतकरी व नागरिक उपस्थित होते.