वणी नितेश ताजणे (वा.). येत्या 6 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या वणीच्या नामांकित दि वसंत को ऑपरेटिव्ह शेतकरी जिनिंग प्रेसिंग फक्ट्री या संस्थेच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदा चार पॅनल उभे ठाकल्याने वसंत जिनिंगची चौरंगी लढत दिसून येत आहे.
वसंत जिनिंगची 17 जागेसाठी 63 उमेदवार रिंगणात असून या उमेदवाराचा समावेश चार पॅनेलमध्ये आहे, त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे. यामध्ये काँग्रेस पक्षाचे माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वातील परिवर्तन पॅनल विद्यमान आमदार बोडकुरवार यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी एकता परिवर्तन पॅनल, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अनिल संजीवरेड्डी
हेपट यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी ब्रिगेड, शेतकरी संघटना, मिळून वसंत जिनिंग बचाव पॅनल तर रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. देविदास काळे यांच्या नेतृत्वातील जय सहकार पॅनल अशी एकूण 63 उमेदवारांचे चार पॅनल निवडणुकीत उभे करून मतदारात संभ्रम निर्माण केला आहे. माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वातील पॅनलच्या प्रचाराचे नारळ रंगनाथ स्वामी मंदिरात फोडून प्रचाराचा प्रारंभ केला आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीचीहोईल, असे काही जाणकारांचे मत आहे. कारण मागील दोन टर्म अॅड. देविदास काळे यांनी वसंत जिनिंगचा सांभाळ केला आहे. त्यातल्या त्यात रंगनाथ स्वामी पतसंस्थेच्या निवडणुक जिंकल्याने पुन्हा त्यांना अध्यक्षपद बहाल करण्यात आले आहे. त्यामुळे या चौरंगी निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. विशेष मागील 30 वर्षांपासून अॅड. देवीदास काळे यांची वसंत जिनिंगमध्ये एकहाती सत्ता राहिली आहे. सहकार क्षेत्रात देवीदास काळे यांचा नेहमीच दबदबा राहिला आहे. या निवडणुकीत वसंत जिनिंगची एकूण 10 हजार 924 मतदार आहे. ते सर्व मतदार या निवडणुकीत सहभागी होतील की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे उमेदवारांची दमछाक होण्याची शक्यता नाकारता येत नाही
