वडकी वीज वितरण विभागाच्या लपंडावामुळे ग्रामीण भागातील जनता त्रस्त , संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज


सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील वडकी वीज वितरण विभागाच्या लपंनडावामुळे रिधोरा सह परिसरातील ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाली असल्याचे दिसून येत आहे. सविस्तर वृत्त असे वडकी वीज वितरण विभागाच्या लपंनडावामुळे ग्रामीण भागातील जनता ही दोन वर्षापासून त्रस्त झाली असल्याचे दिसून येत आहे. सदर वडकी वीज वितरण विभाग ही यंत्रणा फक्त बिल वसूल करण्यातच माहीर आहेत परंतु सेवा देण्यात झिरो झाली आहे.तर अशा लपंनडावामुळे काही दिवसांपूर्वी एका संताप शेतकऱ्यांनी येथील एका अधिकाऱ्यांना चांगलेच बदाडले होते परंतु येथील अभियंता व कर्मचाऱ्यावर त्याचा कुठलाही फरक पडला नाही आजही तीच परिस्थिती येते की काय? असा संताप शेतकऱ्यांमध्ये व शेतमजुरामध्ये होताना दिसत आहे. कारण रात्रीच्या वेळी कुठल्याही प्रकारचा वारा पाऊस नसताना सुद्धा दहा दहा घंटे लाईट बंद ठेवणे व शेतकरी व शेतमजूर यांना नाहक त्रास देणे हा प्रकार सध्या वडकी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांमुळे सुरू आहे. सदर आता शेतकऱ्यांना सोयाबीन व कपाशीला पाणी देण्याची गरज आहे अशातच दिवसामधून दहा वेळा लाईट जाणे हे शेतकऱ्यांची डोकेदुखी झाली आहे तर रात्री मधून दादा घंटे लाईट नसणे हेही एक शेतकरी व शेतमजुरांना डोकेदुखी झाली आहे दिवसभर शेतामध्ये राब राब राबून शेतकऱ्यांना व शेतमजुरांना लाईट अभावी रात्री सुखाची झोप सुद्धा येत नाही याला जबाबदर वडकी वीज वितरण विभागच आहे. तर वडकी वीज वितरण विभागाला नव्याने रुजू झालेले सहाय्यक अभियंता नागपुरे हे तरी शेतकऱ्यांना दिवसाला सुरळीत वीज पुरवठा देतील का ? व शेतकऱ्यांना व शेतमजुरांना रात्रीची सुखाची झोप घेऊ देईल का ? असे शेतकरी शेतमजुरामध्ये बोलल्या जात आहे