
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दिनांक ०९/०८/२०२५
सोनामाता हायस्कूल येथे नारळीपौर्णिमा व रक्षाबंधनानिमित्त “वृक्षबंधन” कार्यक्रम साजरा करण्यात आला. यात विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन व निसर्ग रक्षणाची जाणीव व्हावी, म्हणून विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळेतील वृक्षांना राखी बांधण्यात आली.कार्यानुभव या विषया अंतर्गत सहशालेय उपक्रम म्हणून विद्यार्थ्यांना राखी तयार करण्याची स्पर्धा हा उपक्रम घेण्यात आला. उत्कृष्ट अशी राखी तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर बक्षिसे देण्यात आली. तयार झालेल्या राख्या शाळेतील विद्यार्थी शिक्षक यांना बांधून शालेय स्तरावर रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यातून विद्यार्थ्यांमध्ये बंधुभाव सहकार्य करण्याची भावना जागृत होईल,तसेच पर्यावरण प्रेम जागृती करण्याच्या हेतूने शाळेत वृक्ष संवर्धन व्हावे व विद्यार्थ्यांना वृक्षा बद्दल जाणीव जागृती निर्माण व्हावा वृक्षाचे महत्त्व समजून घेऊन त्याची संवर्धन करण्याची सवय लागावी म्हणून शाळेतील परिसरात असलेले वृक्षांना रक्षाबंधन करून रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला. या सणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जिव्हाळ्याची भावना निर्माण होईल असे प्रतिपादन शाळेचे मुख्याध्यापक श्री अनिल धोबे सर यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री दांडेकर सर व आभार श्री कांबळे सर यांनी मानले. शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.
