यवतमाळ जिल्ह्यात यावर्षी शेतकरी संघटना प्रतिबंधित कापूस लागवड करणार


यवतमाळ जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने १मे २०२२ पासून आंदोलनाची सुरुवात करणार आहे.
यवतमाळ जिल्हा मध्ये असलेले कापूस हे नगदी पीक असून त्याखालील क्षेत्र साडेपाच लाख हेक्टर असून यावर आधारित 100 च्या वर जिनिंग व प्रेसिंग युनिट असून त्यामध्ये चौदा ते पंधरा लाख गाठी तयार होतात परंतु मागील चार वर्षापासून कापसाचे उत्पादन कमी झाल्यामुळे त्या सर्व जिनिंग युनिट 50% उत्पादनावर काम करीत आहे जिल्ह्यामध्ये कापसाचे उत्पादन कमी होण्यामागे कारण की बोल गार्ड दोन नंतर कोणत्याही तंत्रज्ञानाला बदल न झाल्यामुळे हे उत्पादन कमी झाले आहे मागील बारा वर्षापासून कापसा मधील नवीन वाण एच टी बी टी शेतकऱ्यापर्यंत केंद्र सरकारची परवानगी नसल्यामुळे पोहोचला नाही तसेच दर वर्षी त्यावर गुलाबी बोंड अळी येऊन पीक नष्ट करत आहे तरीही सरकार कडे वारंवार मागणी करून ही एच टी बी टी वाण शेतकर्‍याकडे लागवडीस उपलब्ध होत नाही परंतु या सर्व वाणाचे ट्रायल बारा वर्षापासून होऊन सरकार कडे याचा अहवाल सादर केला आहे, यावर्षी या वाणाला शेतकऱ्याला लागवडीस परमिशन मिळेल अशी धारणा होती परंतु केंद्र शासनाच्या दिरंगाईमुळे व कोणत्याही प्रकारचा आदेश राज्य सरकारला न मिळाल्यामुळे विद्यापीठात होणाऱ्या ट्रायल सुद्धा या वर्षी होणार नाहीत अशी परिस्थिती दिसत आहे, जर केंद्र शासन व राज्य शासन अशा प्रकारच्या कोणत्याही वाणाच्या ट्रायल करायला उत्सुक नसेल तर शेतकरी संघटना या सर्व वानाची ट्रायल आणि लागवड आपल्या शेतात करेल. शेतकरी संघटनेची या एच डी बी टी साठी लागणाऱ्या सर्व परवानग्या जसे बी तयार करणे पॅकिंग करणे ब्रॅण्डिंग करणे वाहतूक करणे साठवणूक करणे विक्री करणे व शेतात लागवड करणे या गोष्टी सरकार कडून जरी प्रतिबंधित केले आहे तरी शेतकरी संघटना आंदोलन करून ह्या सर्व गोष्टी यवतमाळ जिल्ह्यात घडवून आणणार आहे, त्याकरिता शेतकरी संघटना यवतमाळ जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र झोटींग, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सोनाली मरगडे, राज्य महिला आघाडीच्या अध्यक्ष प्रज्ञाताई बापट ,जयंतराव बापट ,विजय निवल , दिपकअन्ना आंनदवार, देवेंद्र राऊत, कृष्णराव भोंगाडे, हिंमतराव देशमुख ,चंद्रशेखर देशमुख ,देवरावजी धांडे, दशरथ पाटील, इदरचंद बैद, रमेश मांगुळकर, बबनराव चौधरी, प्रज्ञाताई चौधरी, अक्षय महाजन, गोपाल भोयर, इत्यादी अनेक कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात जास्तीत जास्त बीटी कापूस वाणाची लागवड करावी असे आव्हान केले आहे आणि सरकारला तंत्रज्ञान स्वातंत्र्यासाठी लढा देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आव्हान केले आहे.