
सहसंपादक ::रामभाऊ भोयर
शहरातील वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी वृत्ती जोपासून रुग्णांना पूर्णवेळ सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा तसेच दानशूर व्यक्तिमत्व व मॉर्निंग पार्क ग्रुपचे सदस्य संजय पोपट यांचा मुलाने (सी ए ) च्या परीक्षेत घवघवीत यश मिळविल्या बदल राळेगाव येथील मॉर्निंग पार्क ग्रुपच्या वतीने दिं.३० नोव्हेंबर २०२५ रोज रविवारला सकाळी ७:०० वाजता मान्यवरांचा सत्कार सोहळा पार पडला
यावेळी शहरातील डॉ असोसिएशनचे सदस्य डॉ हेमंत गलाट, तसेच असोसिएशनचे मुख्य सल्लागार डॉ. ओमप्रकाश फुलमाळी हे रुग्णांना अहोरात्र सेवा देत असून त्यांच्या या कार्याची दखल घेत राळेगाव येथील मॉर्निंग पार्क ग्रुप च्या वतीने डॉ.हेमंत गलाट व डॉ. ओम प्रकाश फुलमाळी यांचा सत्कार व सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले.
तसेच राळेगाव शहरातील दानशूर व्यक्तिमत्व असलेले संजय पोपट यांचा मुलगा कपिल पोपट यांनी सीएच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केल्याबद्दल कपिल पोपट यांलाही मॉर्निंग पार्क ग्रुप च्या वतीने सत्कार व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.
या सत्कार सोहळ्याप्रसंगी मॉर्निंग पार्क ग्रुपचे सदस्य तथा नगरपंचायतीचे उपाध्यक्ष जानराव गिरी, अँड मांडवकर संजय पोपट यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सत्कारमूर्ती डॉ. ओम प्रकाश फुलमाळी तसेच डॉ.हेमंत गलाट व कपिल पोपट यांनी आपले मनोगत व्यक्त करून मॉर्निंग पार्क ग्रुपने केलेल्या सत्कारा बद्दल मॉर्निंग ग्रुपचे आभार व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे संचालन मॉर्निंग पार्क ग्रुपचे सदस्य राजू नागपुरे तर प्रास्ताविक प्रदीप ठूणे,यांनी केले तर आभार प्रदर्शन अँड किशोर मांडवकर यांनी केले यावेळी उपस्थित मॉर्निंग पार्क ग्रुपचे प्रदीप ठुने, संजय पोपट, जानराव गिरी, राजेंद्र नागतुरे,किशोर मांडवकर, भारत ठुने, आशिष इंगळे, विनोद नरड,बबलू सैय्यद, प्रमोद ताकसांडे, सचिनसिंह चौहान, विवेक गवळी,सतीश डाखोरे,प्रफुल्ल कोल्हे, निलेश पोपट, सागर इंझाळकर मिलिंद वाठोरे, सुनील भामकर,सुरेश नेहारे,रामकृष्ण भोयर, अनिल डंभारे ,समीर लाखाणी,किशोर जुनूनकर,प्रभाकर रामगडे, प्रशांत तोतला, गणेश राऊत, दिपक आटे, रवींद्र निळ,कपिल नहाते,सुनील भटकर, नज्जुभाई, किशोर सरदार,चंद्रकांत भाजपाले आदी उपस्थित होते
