
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वडकी येथे पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनायक जाधव यांची पांढरकवडा येथे बदली झाल्याने त्यांचे ठिकाणी पोलीस ठाणेदार मनून विजय महाले हे रुजू झाले आहेत, मागील काही वर्षा पासून वडकी पोलीस स्टेशन चा कारभार विनायक जाधव यांनी आपली कारकीर्द प्रामाणिक व चोखपणे बजावीली अशी आशा घेवून पुढील कार्य विजय महाले ठाणेदार करतील अशी चर्चा जनतेतून दिसून येत आहे, आज 04 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांच्या आदेशाने वडकी ठाणेदार पदी महल्ले यांची बदली झाल्याने वडकी विजय महाले वडकी स्टेशन चा पदभार सांभाळण्यासाठी शनिवारला हजर झाले आहे.
राळेगाव तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था जोपासताना व शहराचं सामाजिक सलोखा, वाहतूक, नागरिकांच्या जीवित्व व मालमत्ता रक्षणाची जबाबदारी प्राधान्य क्रमाने पार पाडू व सामाजिक सलोख्या सोबत गुन्हे डिटेक्शन व कनव्हिक्शन याकडे सुद्धा विशेष लक्ष ठेवण्याचे कर्तव्य आम्ही पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या समवेत चौख पणे पार पाडणार असल्याची माहिती सुद्धा महल्ले सर यांनी दिली आहे.
